

तारापूर, ता. २६ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कास्टिंग यार्डसाठी महसूल विभागाची परवानगी न घेता साखरे येथे अनधिकृत उत्खनन आणि बांधकाम करण्यात आले. याप्रकरणी जमीन मालक आणि ठेकेदार कंपनीविरोधात दंडात्मक कारवाईची नोटीस डहाणू तहसीलदारांनी जारी केली आहे.
पालघर जिल्ह्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाच्या कास्टिंग यार्ड उभारणीसाठी वाणगावजवळील साखरे येथील खासगी जागा जमीन मालकांनी ठेकेदार कंपनीला भाडेपट्ट्यावर दिली आहे. जमीन मालक आणि कंपनीने महसूल विभागाची अधिकृत परवानगी न घेता दोन हजार ४१८ ब्रास मातीचे उत्खनन आणि वाणिज्य प्रकारचे बांधकाम केले आहे. या कास्टिंग यार्डच्या धुळीमुळे चिकू, हंगामी भात पीक, मिरची, तसेच बागायत वाडीमधील अन्य पिकांवरील परिणाम होत असल्याच्या तक्रारी तहसीलदारांकडे केली होती. साखरे, दाबले येथे अनधिकृत उत्खनन आणि बांधकामाबाबत सहा महिन्यांपासून तहसीलदार कार्यालयात तक्रार करूनही कारवाई करण्यात येत नाही, असा आरोप शेतकरी रमन कोम यांनी केला आहे.
वाणगाव मंडळ अधिकारी यांनी स्थळपाहणी आणि पंचनामा करून अनधिकृतरित्या माती उत्खनन, गौणखनिजाचा साठा आणि वाणिज्य बांधकाम केल्याचा अहवाल डहाणू तहसीलदारांना सादर केला होता. त्यानुसार तहसीलदार सुनील कोळी यांनी जागा मालक आणि ठेकेदार कंपनीला आवश्यक परवानगीच्या कागदपत्रांसह दंडात्मक कारवाईच्या सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासाठी नोटीस जारी केली आहे.
साखरे येथे बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कास्टिंग यार्डसाठी महसूल विभागाची परवानगी न घेता अनधिकृत उत्खनन आणि वाणिज्य बांधकाम केल्याचा अहवाल मंडळ अधिकारी यांनी सादर केला. याप्रकरणी संबंधित जमीन मालक आणि ठेकेदार कंपनीची सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर दंडात्मक कारवाईबाबत निर्णय घेण्यात येईल.
- सुनील कोळी, तहसीलदार, डहाणू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.