अक्षता देशपांडे यांना कवी कुसुमाग्रज पुरस्कार

अक्षता देशपांडे यांना कवी कुसुमाग्रज पुरस्कार

Published on

भाईंदर, ता. २५ (बातमीदार) : मिरा रोडमध्ये राहणाऱ्या लेखिका, साहित्यिका अक्षता प्रसाद देशपांडे यांना सर्वद फाउंडेशन संस्थेतर्फे कवी कुसुमाग्रज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात चित्रपट निर्माते देवेंद्र खन्ना, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रशंसा राऊत-दळवी, निवेदिका आणि अभिनेत्री पूनम चांदोरकर, लेखिका डॉ. सूचिता पाटील आदींच्या उपस्थितीत देशपांडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशपांडे यांनी अनेक पुस्तके, कविता कन्नडमधून मराठी, तसेच मराठीतून कन्नड भाषेत अनुवादित केल्या आहेत. छोट्या पडद्यावरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मराठी मालिकेची कन्नड रिमेकची पटकथा आणि अनुवाद, स्वामी समर्थ यांच्यावरील ओव्या, त्याचप्रमाणे कविता, गझल असे साहित्य त्यांनी लिहिले आहे. सध्या मिरा रोडच्या सिल्वर सरिता परिसरात राहत असलेल्या अक्षता देशपांडे मूळच्या बेळगावच्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com