बेकायदा बांधकामप्रकरणी चौघांवर गुन्हा
कल्याण, ता. २५ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील आय प्रभागात बेकायदा बांधकामे झाली आहेत. याप्रकरणी अधीक्षकांच्या तक्रारीनंतर हिललाइन पोलिस स्टेशनमध्ये चौघांवर एमआरटीपीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केडीएमसी आय प्रभागाचे अधीक्षक शंकर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आय प्रभागातील बाळकृष्ण फुलोरे, मंगेश फुलोरे, सुनील राणे, सचिन म्हात्रे यांनी श्रीमलंग रोड, पुंडलिक म्हात्रे शाळेच्या मागील बेकायदा चाळींच्या बांधकामाची कागदपत्रे सादर करण्याबाबत पालिका अधिनियम, १९४९चे कलम २६० व २६७ (१) अन्वये नोटीस दिली होती. याबाबतची कोणतीही कागदपत्रे सादर केली नसल्याने हिललाइन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

