डहाणूत रंगणार ‘मातीच्या रंगांचे संमेलन’

डहाणूत रंगणार ‘मातीच्या रंगांचे संमेलन’

Published on

डहाणूत रंगणार ‘मातीच्या रंगांचे संमेलन’
आदिवासी कला-संस्कृतीचा उत्सव

कासा, ता. २६ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील बापूगाव, गंजाड आणि घोलवड या गावांमध्ये ‘मातीच्या रंगांचे संमेलन’ या अनोख्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २८ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हा सांस्कृतिक महोत्सव रंगणार आहे.
हा आदिवासी परंपरेचा ठेवा जपणारा महोत्सव असणार आहे. यामध्ये वारली, कोकणा, कोकणी, मल्हार कोळी आणि महादेव कोळी या आदिवासी समाजाच्या पारंपरिक कलांचा आनंद घेता येणार आहे. लोककला, नृत्य, लोकगीते, दंतकथा, खानपान, सण-उत्सवांच्या सादरीकरणातून पर्यटकांना स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेता येणार आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) सहकार्याने आयोजित या महोत्सवाचा उद्देश ग्रामीण संस्कृती संवर्धन आणि पर्यटनाला चालना देणे हा आहे.
----------------------------
चित्रकलेपासून लोकनृत्यापर्यंत
महोत्सवामध्ये वारली चित्रकला, पारंपरिक मुखवटे, बांबू हस्तकला, स्थानिक महिला व युवकांनी तयार केलेल्या वस्तू तसेच ग्रामीण खाद्यसंस्कृतीमध्ये पारंपरिक खाद्यपदार्थांचे स्टॉल, लोकनृत्य आणि वाद्यसंगीतामध्ये तारपा, कावड नृत्य, ठाकर पावरी नृत्य, संबळ वाद्य, ढोल नाच, गवरी नाच असणार आहेत.
---------------------------------
आदिवासी जीवनशैलीचे दर्शन
स्थानिक कलावंतांकडून वारली चित्रकला, तारपा तयार करण्याचे प्रात्यक्षिक, वनौषधी आणि जीवनशैली प्रदर्शन करण्यात येणार आहे. पारंपरिक औषधी वनस्पती व आदिवासी जीवनशैलीचे दर्शनदेखील केले जाणार आहे.
---------------------------
यामध्ये देशभरातील कलाकार आणि अभ्यासकांचा सहभाग असणार आहे. या महोत्सवात गोवा, नागपूर, पालघर, नाशिक, ठाणे, मुंबई आणि इतर भागांतील प्रतिष्ठित कलाकार, एमटीडीसीचे प्रतिनिधी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शालेय विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. आयोजक सुमन दास यांनी सांगितले, की महाराष्ट्रातील आदिवासी परंपरा सर्वदूर पोहोचावी, स्थानिक कला, खानपान, नृत्य-नाट्य यांना व्यासपीठ मिळावे तसेच पर्यटनाच्या माध्यमातून येथील अर्थव्यवस्था उंचावावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. फेस्टिव्हलचे उद्घाटन २८ फेब्रुवारी रोजी गंजाड येथे होणार असून, त्यानंतर बापूगाव आणि घोलवड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मातीच्या रंगांचे संमेलन’च्या निमित्ताने पालघर जिल्ह्यातील आदिवासी संस्कृतीला नवा सन्मान मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com