खाऊगल्लीचा मार्ग झाला चकाचक

खाऊगल्लीचा मार्ग झाला चकाचक

Published on

खाऊ गल्लीचा मार्ग झाला चकाचक
फेरीवाल्‍यांना हटवल्‍याने वाहनचालकांसह प्रवाशांना दिलासा
कांदिवली, ता. २६ (बातमीदार) ः कांदिवली आणि बोरिवली विभाग जोडणारा चारकोप-पोईसर लिंक रोड या मुख्य मार्गावर डीमार्ट, महावीर नगर येथे खाऊ गल्ली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी (ता. २५) कार्यक्रमासाठी चारकोपला येणार असल्याने चारकोपकडे जाणाऱ्या मुख्य मार्गांवर पालिकेने सकाळपासून धडक कारवाई करीत फेरीवाला, अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई केली. त्‍यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.
महावीरनगरची खाऊ गल्ली उपनगरात प्रसिद्ध आहे. चारकोप -पोईसर लिंक रोडवर डीमार्ट आणि महावीरनगर कल्पना चावला चौकामधील मार्गावर दुतर्फा व्यावसायिक दुकाने आहेत. सायंकाळी सात ते रात्री १२ वाजेपर्यंत येथे खवय्यांची प्रचंड गर्दी असते. त्‍यामुळे कांदिवली रेल्‍वे स्‍थानकाकडून चारकोप गोराई आणि बोरिवलीकडे तसेच त्या ठिकाणाहून रेल्‍वे स्‍थानकाकडे जाणाऱ्या बेस्ट बसेस, इतर वाहने, दुचाकीस्वारांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही पालिकेने अनेक वर्षे ठोस कारवाई केली नव्हती. तक्रारी वाढल्या की पालिका थातूरमातूर कारवाई करते. त्यातही अनधिकृत व्यावसायिकांना आधीच सूचना मिळते. पालिकेच्या पथकाने तब्बल चार वाहने उभी करून कारवाई केल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com