लडाखच्या पँगाँग लेकवर हाफ मॅरेथॉन पूर्ण
लडाखच्या पँगाँग लेकवर हाफ मॅरेथॉन पूर्ण
घाटकोपरच्या विद्याभवनच्या शिक्षकाचे यश
घाटकोपर, ता. २६ (बातमीदार) ः लडाखमधील समुद्रसपाटीपासून सुमारे १४ हजार २७० फूट उंचीवर वसलेल्या पँगाँग लेकच्या गोठलेल्या पृष्ठभागावर मंगळवारी (ता. २५) असोसिएशन स्पोर्ट फेडरेशन ऑफ लडाख व भारतीय सेना यांनी आयोजित केलेली २१ किलोमीटरची हाफ मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण करून दीपक रंगनाथ निचित, सहाय्यक शिक्षक, विद्या भवन प्राथमिक इंग्रजी विभाग, घाटकोपर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
अत्यंत कमी तापमान (उणे ४०), कडक थंडी आणि कमी ऑक्सिजन अशा कठीण परिस्थितीतही त्यांनी २१.०४ किमीचे अंतर तीन तास ३४ मिनिटांत पूर्ण करून महाराष्ट्राचे नाव उंचावले. हा संपूर्ण उपक्रम लडाख प्रशासन भारतीय सेना आणि विविध संस्थांच्या सहकार्याने पार पडला.
या यशाबद्दल शिक्षक निचित यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. उच्च उंचीवरील कमी ऑक्सिजन, गोठलेले पाणी आणि अनियमित हवामान अशा प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेल्या या विजयाने अनेक युवा धावपटूंना प्रेरणा मिळेल, अशी भावना क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
सर्वाधिक उंचावर गोठलेले सरोवर
पँगाँग लेक हे जगातील सर्वात उंचावर वसलेले गोठलेले सरोवर म्हणून ओळखले जाते. इथे हिवाळ्यात तापमान -३० अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते. त्यामुळे अशा थंडीत धावणे हे धावपटूंसाठी मोठे आव्हान असते. तरीही शिक्षक दीपक निचित यांनी चिकाटी, आत्मविश्वास आणि कठोर प्रशिक्षणाच्या बळावर ही मॅरेथॉन पूर्ण केल्याचे त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

