कुलाव्याती खोदलेल्या रस्ते तातडीने पूर्ण न केल्यास आंदोलन

कुलाव्याती खोदलेल्या रस्ते तातडीने पूर्ण न केल्यास आंदोलन
Published on

रस्तेदुरुस्ती रखडल्याने रहिवासी आक्रमक
कुलाब्यात आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ ः कुलाबा परिसरात सिमेंट-काँक्रीट रस्त्यांच्या कामांसाठी केलेल्या खोदकामांमुळे नागरिकांना गैरसोयीला सामोर जावे लागते आहे. हे खोदलेले रस्ते २७ फेब्रुवारीपर्यंत सुस्थितीत न आणल्यास कुलाबा येथील रहिवाशांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र देऊन या समस्येकडे लक्ष वेधले आहे.
कुलाबा परिसरात पालिकेने सिमेंट-काँक्रीट रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. या कामांसाठी रस्ते ठिकठिकाणी खोदून ठेवले आहेत. पावसाआधी हे रस्ते दुरुस्त करणे आवश्यक आहे; मात्र पालिकेच्या उदासीनतेमुळे हे रस्ते अद्याप खोदलेल्या स्थितीतच असल्याने नागरिकांची गैरसोय होते आहे. सीसी रस्त्यांच्या कामांसाठी हाती घेतलेले फर्स्ट पास्ता लेन आणि विंडी हॉल लेनसह इतर महत्त्वाचे रस्ते अनेक महिन्यांपासून अपूर्ण आहेत. यामुळे रहिवाशांना प्रचंड त्रास होत आहे, असे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी पालिका प्रशासक भूषण गगराणी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. पालिकेने या खोदलेल्या रस्त्यांची कामे २७ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याची मागणी केली आहे. या मुदतीत ही समस्या दूर झाली नाही तर रहिवासी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी संबंधित रस्त्यांवर आंदोलन करतील, असा इशारा नार्वेकर यांनी दिला आहे.
...
कामात दिरंगाई
सीसी रस्त्यांच्या कामात निष्काळजीपणा केल्याबद्दल कंत्राटदाराला ५० हजार रुपयांपर्यंत दंड करण्याचा अधिकार कार्यकारी अभियंत्यांना आहे; परंतु कंत्राटदारावर क्षुल्लक रक्कम दंड म्हणून आकारण्यात आली आहे. यामुळे कंत्राटदार आणि पालिका अभियंते यांच्यामध्ये संगनमत असल्याचा संशय निर्माण होतो, असा मकरंद नार्वेकर यांनी आरोप केला आहे.
...
खोदलेल्या रस्त्यांमुळे प्रदूषणात वाढ
खोदून ठेवलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे प्रदूषणात भर पडते, या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी बेकरी, हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये लाकूड आणि कोळशाच्या वापरावर बंदी घालण्यासारख्या मुद्द्यांकडे महापालिका जास्त लक्ष देत आहे; मात्र प्रदूषणात थेट भर घालणाऱ्या आणि दैनंदिन जीवनात व्यत्यय आणणाऱ्या रस्त्यांच्या खोदकामांकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोपही मकरंद नार्वेकर यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com