

‘हरहर महादेव’चा जयघोष
विक्रमगडमध्ये विविध शिवमंदिरांत महाशिवरात्री यात्रोत्सव
विक्रमगड, ता. २६ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यातील सर्वच लहान-मोठी शिवमंदिरे महाशिवरात्री उत्सवानिमित्त सजविण्यात आली होती. शहरातील अत्यंत प्राचीन पंतगेश्वर महादेव व इतिहासकालीन नागझरी व कावळे मठ शिवमंदिरामध्ये भाविकांसाठी दरवर्षी होणारी गर्दी लक्षात घेऊन शासनासह पोलिस, मंदिर समितीने भक्तांच्या स्वागतासाठी खास आयोजन केले होते. विक्रमगड तालुक्यातील विविध शिवमंदिरांतील शिवलिंगांचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. दर्शनासाठी लांबच लांब रांग लागल्या होत्या. तसेच मंदिर परिसरात वेगवेगळ्या वस्तूविक्रेत्यांनी स्टाॅल लावले होते.
प्राचीन महादेव पंतगेश्वर मंदिर, नागझरीचे नागेश्वर मंदिर, कावळे मठ येथे उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आठवडाभरापासून रंगरंगोटी, साफसफाई करून जय्यत तयारी केली होती. तसेच प्राचीन पांडवकालीन शिवमंदिर कपालेश्वर नागझरी स्वयंभू मंदिरात भव्य सभामंडप उभारण्यात आला होता. शिव गोरक्षनाथ पावन मठ कावळे येथे मंदिरात येणाऱ्या साधूंचा मुक्काम वाढत असून साधूंच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर स्वागताची भव्य कमान उभारण्यात आली होती. कावळे मठाचे गुरुवर्य बालकनाथजी बाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी आदल्या दिवसापासूनच गर्दी केली होती. या दिवशी या मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पहाटेच्या महापूजेनंतर भजन, कीर्तन, अभिषेकाचे आयोजन केले होते. या वेळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सरबत व थंड पाण्याची मोफत सेवा देण्यात आली.
MUM25E79684
-------------------------------------
महादेव, नंदीची साकारली रांगोळी
कासा, ता. २६ (बातमीदार) : महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरात दर्शनासाठी गर्दी करीत असतानाच डहाणू येथील चित्रकार उज्ज्वला डामसे यांनी आपल्या घरासमोर नीलवर्णीय महादेव व श्वेतवर्णीय नंदी यांची सुरेख रांगोळी चितारली आहे. चार बाय पाच फूट असणाऱ्या रांगोळीसाठी पाच ते साडेपाच तास लागल्याचे उज्ज्वला डामसे यांनी सांगितले. ही रांगोळी पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. डामसे यांच्याकडून प्रत्येक सण-समारंभाला रांगोळ्या काढत असतात.
MUM25E79685
------------------------------------------
बाळ कापरामध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा
जव्हार, ता. २६ (बातमीदार) : बाळ कापरा येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरविली जाते. यानिमित्त हजारो भाविक दर्शनासाठी दाखल होतात. जव्हार शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर डहाणू रस्त्याला निसर्गसौंदर्याने नटलेल्या रम्य बाळ कापरा परिसरात घनदाट जंगल, वृक्षांची सावली, बोरे, आंबा, काजू आणि अनेक जंगली झाडे व वनस्पती अशा नैसर्गिक संपत्तीने वेढलेला शिवमंदिराचा परिसर नयनरम्य आहे. दरम्यान, यात्रेत कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी जव्हार पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक किशोर मानभाव यांनी सांगितले. इम्रान कोतवाल यांनी सांगितले, की बाळ कापरा येथील यात्रा संस्थान काळापासून प्रसिद्ध असल्यामुळे नाशिक, डहाणू, सिलवाससारख्या ठिकाणांहूनही हजारो भाविक येथे दाखल होतात.
********************
जव्हार : यात्रेदरम्यान पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
MUM25E79687इम्रान कोतवाल
MUM25E79686
------------------------------------------------------
निर्मळमध्ये लघुरुद्र अभिषेक
विरार ता. २६ (बातमीदार) : वसई तालुक्यातील भगवान परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेले श्रीक्षेत्र निर्मळ आहे. त्याचबरोबर आद्य शंकराचार्यांची समाधी असलेल्या निर्मळ येथील मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिरात पहाटे तीन वाजता वीरेंद्र पटेल यांच्या हस्ते लघुरुद्र अभिषेक घालण्यात आला. या वेळी मंदिर ट्रस्टचे बबन शेट-नाईक, छगन शेट-नाईक, पंकज चोरगे व इतर मान्यवर उपस्थित होते.
MUM25E79688
---------------------------------------
दापचरी कपिलेश्वर मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम
कासा, ता. २६ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील दापचरी येथील कपिलेश्वर शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या उत्साहात सुरू असून, विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यंदाही भजन, कीर्तन, प्रवचन आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महाशिवरात्रीनिमित्त पहाटे मंदिरात पूजा करण्यात आली. महाशिवरात्र यात्रा ही परिसरातील सर्वांत मोठ्या जत्रांपैकी एक असून, पंचक्रोशीतील आदिवासी बांधव तसेच चारोटी, तलासरी, कासा परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने सहभाग घेतात.
मंदिर परिसर सुंदर मंडप डेकोरेशन फुलांचे डेकोरेशन करून आकर्षक सजवण्यात आला होता. पुरातन शिवमंदिर म्हणून आजूबाजूच्या परिसरातून दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
MUM25E79700
-------------------------
घुटकेश्वर महादेव मंदिरात शिवभक्तांची मांदियाळी
मोखाडा. ता. २६ (बातमीदार) : मोखाड्यातील वाकडपाडा येथील घुटकेश्वर महादेव मंदिरात शिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यामुळे नदीकाठी असलेला मंदिर परिसरात भक्तीचा मळा फुलला होता. घुटकेश्वर महादेव मंदिरात सकाळपासूनच विविध गावांमधून पायी दिंड्या, भजन-किर्तनातून महादेवाचा जयघोष करीत दर्शनासाठी येत होत्या. यावेळी महादेवाच्या पिंडीवर अभिषेक, महाआरती, स्वाध्याय परिवार कार्यक्रमासह, ह.भ.प.रघुनाथ महाराज झोले यांचे कीर्तन, रात्री भजन असा संपूर्ण दिवस चा कार्यक्रम समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या भाविकांचे मंदिर समिती चे अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी आभार मानले आहे. यावेळी मंदिर समिती अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी मंदिर बांधकामासाठी सहकार्य करणाऱ्या देणगीदारांना यावेळी सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
MUM25E79701
---------------------------------------------
कोकनेर शिवमंदिर परिसरात स्नान करण्यासाठी गर्दी
पालघर, ता. २६ (बातमीदार): पालघर परिसरात महाशिवरात्री निमित्त सकाळपासूनच शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. एडवण येथे अरबी समुद्रकाठी महादेवाचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती. केळवे, जवळी, भवानगड येथेही पुरातन शिवमंदिरातही भाविकांनी गर्दी केली होती. कोकणेर येथील शिवमंदिर आहे सूर्या नदीच्या काठी असून येथे स्नान करण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
MUM25E79702
पालघर: शिव मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती
------------------------------
महाशिवरात्र निमित्त रक्तदान शिबिरात ५५ रक्तदात्यांचे योगदान
कासा, ता. २६ (बातमीदार) : महाशिवराीत्रच्या पावन पर्वावर शिवप्रतिष्ठान, आंबेदा यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पतंगशाह कुटीर रुग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने पार पडलेल्या या शिबिरात ५५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विशेष म्हणजे, ग्राहक रक्षक समितीच्या वतीने रक्तदात्यांना रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट भेट देण्यात आले. ग्राहक रक्षक समितीचे पालघर जिल्हाध्यक्ष कल्पेश घरत यांच्या हस्ते रक्तदात्यांना हेल्मेट प्रदान करण्यात आले. कार्यक्रमास शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पावडे, दीपक गाढवे, रोहन पावडे, अमोल पावडे आदींसह प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते. महाशिवरात्री निमित्त कर्वे बुद्रुक येथील ह. भ. प. संतोष महाराज पुजारी कावडेकर भारूड कार्यक्रम आयोजित केला होता.
MUM25E79703
----------------------------------------
तुंगारेश्वर महादेव अभिषेक
विरार, ता. २६ (बातमीदार) : वसई तालुक्यातील भाविकांचे श्रद्धस्थान असलेल्या तुंगारेश्वर येथील महादेव मंदिरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले. पहाटे या मंदिरात बालयोगी सदानंद महाराजांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी उपस्थित राहून महादेवाचे दर्शन घेतले. वसई तालुक्यातील तुंगारेश्वर पर्वत रंजित असलेल्या तुंगारेश्वर महादेव मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. पालघर, ठाणे, मुंबई जिल्ह्यातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
MUM25E79704
-----------------------------------------------
कोकणेर, सातीवलीच्या शंकर मंदिरात भंडारा
मनोर, ता. २६ (बातमीदार) : महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी (ता. २६) सातीवली आणि कोकणेर गावातील शिवमंदिरात भगवान शंकराच्या पिंडीला दूध आणि जलाभिषेक घालण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. बुधवारी पहाटे पाच वाजल्यापासून सातीवलीच्या गरम पाण्याच्या कुंडात अंघोळ केल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. कुंडांच्या परिसरात छोटेखानी जत्रा भरली होती. महाशिवरात्रीनिमित्त मंदिर व्यवस्थापन समितीकडून भंडाऱ्याचेही आयोजन केले होते. पालघर-मनोर रस्त्यावरील चहाडे नाक्यापासून काही अंतरावर असलेल्या कोकणेर गावातील पुरातन जटाशंकर मंदिरात पालघर, बोईसर, चहाडे आणि पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती. या वेळी भाविकांकडून भगवान शंकराच्या अष्टधातूच्या पिंडीला दूध-जलाचा अभिषेक करण्यात आला.
MUM25E79705
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.