वृद्ध, निराधारांचा म्हाडा होणार आधार
वृद्ध, निराधारांचा म्हाडा होणार आधार
मुंबई, ठाण्यात वृद्धाश्रम उभारणार; गरजूंना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : सर्वसामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणारे म्हाडा आता वृद्ध आणि निराधारांचा आधार होणार आहे. उरत्या वयात वृद्ध आणि निराधारांची गैरसोय होऊ नये, त्यांना हक्काचा निवारा मिळावा, यासाठी म्हाडा मुंबई आणि ठाण्यात वृद्धाश्रम बांधणार आहे. त्यासाठीचे नियोजन सुरू असल्याने गरजू आणि निराधारांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे.
केंद्र सरकार मुंबई महानगर क्षेत्रात ग्रोथ हब बनवत आहे. त्यानुसार येथे येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना घरे उपलब्ध व्हावीत, यासाठी म्हाडाच्या माध्यमातून लाखो घरे उभारली जाणार आहेत. त्याचा भाग म्हणून म्हाडा सुरुवातीला मुंबईत अंधेरीतील आरामनगर येथे तर ठाण्यात माजिवाड्यातील विवेकानंदनगर येथे सर्व सोयींनी सुसज्ज असे वृद्धाश्रम बांधणार आहे. याशिवाय भविष्यात पुणे, नागपूर, नाशिक मंडळातर्फेदेखील वृद्धाश्रम उभारण्याचे नियोजन सुरू असल्याचे म्हाडाने स्पष्ट केले आहे. या वृद्धाश्रमात काय सोयीसुविधा असाव्यात या सर्व बाबींचा विचार करून अंतिम आराखडा तयार केला जाणार असून, त्यानंतरच प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.
महिलांसाठी वसतिगह
सध्या मुंबई, ठाण्यासह परिसरात घरांचे दर गगणाला भिडलेले आहेत. त्यामुळे दोन-तीन वर्षांसाठी येणाऱ्या नोकरदार महिलांना येथे घर घेणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांची गैरसोय टाळण्यासाठी म्हाडाकडून वसतिगृहे उभारण्याचेदेखील म्हाडाचे नियोजन आहे. मुंबई उपनगरांत १० वसतिगृहे उभारण्यात येणार असून, जागेचा शोध सुरू आहे. तर ठाण्यातील माजिवाडा येथे महिलांसाठी एक वसतिगृहे उभारण्याचे प्रस्तावित असून, या वसतिगृहात एकाच वेळी २०० महिलांच्या निवासाची व्यवस्था होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

