वाढवन बंदराजवळ कृत्रिम बेटावर विमानतळाची उभारणी
वाढवण बंदराजवळ कृत्रिम बेटावर विमानतळाची उभारणी
पालघर, ता. २६ (बातमीदार) : जिल्ह्यात विमानतळ उभारण्याचे संकेत राज्य सरकारने दिले असून त्यासाठी पालघर- केळवे रोड रेल्वे स्थानकाच्या मध्यभागी असलेल्या जमिनीचा विचार करण्यात आला होता; त्यानंतर दापचारी परिसरात उभारण्याचा विचार चालू असताना आता वाढवण बंदराजवळ कृत्रिम बेट तयार करून विमानतळ उभारण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव असल्याची माहिती पुढे येत आहे.
वाढवण बंदराजवळ समुद्रामध्ये कृत्रिम बेट उभारून त्यावर विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे; तसे झाल्यास समुद्रामध्ये बांधलेले भारतातील पहिले विमानतळ असेल, याबाबचे संकेतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी दिले आहेत. विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पालघरमधील विमानतळाचा उल्लेख केला होता. पश्चिम किनारपट्टीजवळ बांधल्या जाणाऱ्या या विमानतळाची रचना हॉँगकॉँगचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ओसाकाचे कान साई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्याशी मिळतीजुळती असल्याचे सांगण्यात येते. ही दोन्ही विमानतळे कृत्रिम बेटावर बांधण्यात आली आहेत. वाढवण विमानतळाला केंद्र व राज्य सरकारची प्राथमिक मंजुरी मिळाली आहे; यासंबंधी गेल्या महिन्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. विमानतळ निर्मितीसाठी त्याची व्यवहार्यता तपासण्यासाठी अभ्यास सुरू केला जाईल, या प्रक्रियेत भारतीय विमानतळ प्राधिकरणाची मदत घेतली जाणार असून त्यानंतर याबाबतचा अंदाजे खर्च जाहीर केला जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

