जंगलेश्वर महादेव मंदिरात 
भव्य महाशिवरात्री उत्सव

जंगलेश्वर महादेव मंदिरात भव्य महाशिवरात्री उत्सव

Published on

जंगलेश्वर महादेव मंदिरात
भव्य महाशिवरात्री उत्सव
घाटकोपर, ता. २६ (बातमीदार) ः पूर्व उपनगरातील घाटकोपर पश्चिम येथील जंगलेश्वर मंदिर मार्ग येथे प्रसिद्ध देवस्थान असलेल्या श्री जंगलेश्वर महादेव मंदिरात सालाबादप्रमाणे भव्य महाशिवरात्री उत्सव आयोजित करण्यात आला आहे. जंगलेश्वर भक्त मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष कैलास सदाशिव सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार (ता. २५) ते गुरुवार (ता. २७) या तीन दिवसांच्या कालावधीत महाशिवरात्री महोत्सव पार पडत आहे.
असल्फा गाव, कुलकर्णी वाडी येथील स्वयंभू जंगलेश्वर महादेव मंदिर हे साधारण १७५ वर्षे जुने देवस्थान आहे. पूर्वी येथे नागा साधुसंत पूजा-अर्चा आणि महाशिवरात्री उत्सव साजरा करीत असत. कालांतराने वस्ती वाढत गेल्याने साधूसंतांनी हे ठिकाण सोडले. १९८५मध्ये दिवंगत सदाशिव ऊर्फ बाळमामा सुर्वे यांनी हे छोटेसे जंगलेश्वर मंदिर भव्य स्वरूपात बांधून भव्य महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यास सुरुवात केली.
मंगळवारी दुपारी दोन वाजता अखंड रामायण पाठ प्रारंभ, सायंकाळी साज वाजता अखंड रामायण पाठ समाप्ती, बुधवारी पहाटे ३.३० वाजता षोड्पचार पूजा, पहाटे चार वाजता महाआरती व एककुंडीय रुद्रयज्ञ आणि महामृत्युंजय जप प्रारंभ, दुपारी १२ वाजता महाआरती, सायंकाळी सात वाजता एककुंडीय रुद्रयज्ञ समाप्ती व महाआरती पार पडली. गुरुवारी सायंकाळी श्री सत्यनारायण महापूजा व आरती, महाप्रसाद (भंडारा) वाटप करण्यात येणार आहे. या महाप्रसादाचा हजारो भाविक लाभ घेतात. जंगलेश्वर भक्त मंडळ ट्रस्टचे सदस्य व पदाधिकारी हा उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मेहनत घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com