उरणमध्ये हर हर महादेवचा गजर

उरणमध्ये हर हर महादेवचा गजर
Published on

उरणमध्ये हर हर महादेवचा गजर
हजारो भाविकांनी घेतले श्री शंभू महादेवाचे दर्शन
उरण, ता. २६ (वार्ताहर) ः महाशिवरात्रीनिमित्त उरण तालुक्यातील शिवमंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. घारापुरीसह विविध ठिकाणांवरील शिवमंदिरांत शिवभक्तांनी बेल, फुले वाहून दुग्धाभिषेकही केला. या वेळी भाविकांकडून ‘हर हर महादेव’चा गजर करण्यात आला.
महाशिवरात्रीनिमित्त उरण तालुक्‍यातील कळंबूसरे केगाव, उरण शहर, कोटनाका रेल्वे, जुना शेवा, सोनारी, जासई, चिर्ले, दिघोडे, विंधणे, रानसई, भोम, चिरनेर, खोपटा, पिरकोण, सारडे, आवरे या ठिकाणी महादेवा मंदिरामध्ये भाविकांनी शिवाच्या पिंडीवर बेल, फुले वाहून दुग्धाभिषेकही केला. येथील अनेक शिवमंदिरांत भाविकांनी सकाळपासून गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत होते. त्यामुळे मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. या वेळी मंदिर परिसरात ‘हर हर महादेव’चा गजर दुमदुमून गेला होता. घारापुरी बेटावरील लेणी व शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी दरदिवशी हजारो पर्यटकांची रेलचेल असते. यावर्षीदेखील अबालवृद्धांनी सकाळपासून गावातील शिवमंदिरात गर्दी केली होती. त्यात घारापुरी बेटाकडे जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासन, घारापुरी ग्रामपंचायतीने विशेष काळजी घेतली होती. जवळपास २० ते २५ हजार भाविकांनी घारापुरी येथील महेश मूर्तीचे दर्शन घेतले. यंदा भाविकांची संख्या कमी प्रमाणात असल्याचे दिसून आले. मोरा येथून ११ बोटींची व्यवस्था ये-जा करण्यासाठी करण्यात आली होती. जेएनपीएमधून दोन बोटींची व्यवस्था करण्यात आली होती, तर नावा येथून दोन प्रायव्हेट बोटी सोडण्यात आल्या होत्या. यावर्षीची भाविकांची संख्या मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या बोट दुर्घटनेमुळे कमी झाल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com