२५ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त

२५ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त
Published on

२५ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त

कासा, ता. २६ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी मोहीम तीव्र करण्यात आली असून कासा पोलिसांनी चारोटी नाका येथे २५ लाख रुपये किमतीचे एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज बुधवारी (ता.२६) जप्त केले आहे.

पोलिस पथक महामार्गावर गस्त घालत असताना चारोटी उड्डाणपुलाजवळ एक संशयित व्यक्ती बॅग घेऊन जात असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याला अडवून चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यानंतर चारोटी कोस्टल चौकीत नेऊन पंचांच्या उपस्थितीत त्याची व बॅगेची झडती घेतली असता आरोपीने कपड्यांमध्ये लपवलेले, सफेद कागदात गुंडाळलेले एमडी ड्रग्ज आढळून आले. यामध्ये १२५ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत अंदाजे २५ लाख रुपये आहे. याप्रकरणी राज बाबन शेअल (वय २६) याला ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीत तो अहमदाबादहून मुंबईकडे जात असताना चारोटी येथे वाहन बदलण्यासाठी उतरल्याची माहिती मिळाली आहे. आरोपीविरुद्ध कासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com