परळमध्ये आज ‘झाडांच्या मनात जाऊ’ उपक्रम

परळमध्ये आज ‘झाडांच्या मनात जाऊ’ उपक्रम

Published on

परळमध्ये आज ‘झाडांच्या मनात जाऊ’ उपक्रम
आमदार विठ्ठल चव्हाण स्मृती प्रतिष्ठानचे आयोजन
मुंबई, ता. २७ ः जागतिक मराठी राजभाषा दिनाचे औचित्‍य साधून आमदार विठ्ठल चव्हाण स्मृती प्रतिष्ठानचा नवीन उपक्रम गिरणगाव प्ले स्टेशनतर्फे ‘झाडांच्या मनात जाऊ’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा अनोखा उपक्रम गुरुवारी (ता. २७) सायंकाळी सहा वाजता पुस्तक उद्यान, आयटीसी हॅाटेलच्या बाजूला परळ येथे पार पडणार आहे.
गिरणगावच्या चोखंदळ श्रोते व कलाकारांना एक हक्काचा मंच उपलब्‍ध व्हावा, यासाठी आमदार विठ्ठल चव्हाण स्मृती प्रतिष्ठानने गिरणगाव प्ले स्टेशनची सुरुवात प्रतिष्ठानचे सचिव पराग विठ्ठल चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे. गिरणगावातील कलाकारांना या मंचच्या माध्यमातून आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. मराठी भाषेच्या अनोख्या अभिव्यक्तीतून झाडांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणारा हा अनोखा उपक्रम साहित्य, नाट्य आणि संवादाच्या माध्यमातून साकारला जाणार आहे.
नामवंत साहित्यिक, कलाकार, वृक्षप्रेमी सहभागी होणार असून, शहरातील धकाधकीच्या आयुष्यात वृक्षांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जाणार आहे. झाडांसोबत जोडणाऱ्या अनुभवकथनाचा आनंदही उपस्थितांना घेता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com