दिव्यांग आनंद मेळ्यात साहित्याचे वाटप

दिव्यांग आनंद मेळ्यात साहित्याचे वाटप
Published on

दिव्यांग आनंद मेळ्यात साहित्याचे वाटप
अलिबाग (वार्ताहर) ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रायगड व भगवान महावीर विकलांग सहायता समिती जयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय महाविद्यालय कार्यालय परिसरात दिव्यांग आनंद मेळा मंगळवार (ता. २५) पासून आयोजित करण्यात आला आहे. हा मेळा २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून, दिव्यांग बांधवांना उपयुक्त साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. या दिव्यांग आनंद मेळाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ८० दिव्यांग बांधवांना उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले. दिव्यांग बांधवांना आपल्याला असलेल्या दिव्यांगामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रायगड व भगवान महावीर विकलांग सहायता समिती जयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांना त्यांच्या दिव्यांग प्रकाराप्रमाणे कुबड्या, कॅलिपर, श्रवणयंत्र, तीन चाकी सायकल, व्हीलचेअर, जयपूर पाय हे साहित्य ''दिव्यांग आनंद मेळा'' आयोजित करून उपलब्ध करून देण्यात येत आहे. ''दिव्यांग आनंद मेळा'' उद्घाटन कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, शासकीय महाविद्यालय अधीष्ठाता डॉ. पूर्वा पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी, मोहन साळुंखे, डॉ. मिनल जाधव, साईनाथ पवार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com