रहेजा महाविद्यालयाचा एनएसएस कॅम्प उत्‍साहात

रहेजा महाविद्यालयाचा एनएसएस कॅम्प उत्‍साहात
Published on

रहेजा महाविद्यालयाचा एनएसएस कॅम्प उत्‍साहात
मुंबई, ता. २६ : एल. एस. रहेजा कॉलेज ऑफ आर्टस ॲण्ड कॉमर्स महाविद्यालयाने दत्तक घेतलेल्या बदलापूर येथील जांभीळघर गावातील जे. कृष्णमूर्ती सेल्फ एज्युकेशन सोसायटी आनंदविहार येथे सातदिवसीय एनएसएस शिबिर पार पडले. विद्यार्थ्यांना ग्रामीण भागाचे जीवन जवळून समजून घेता यावे, या उद्देशाने एनएसएसतर्फे प्रत्येक वर्षी हा उपक्रम राबविला जातो.
विविध मान्यवरांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळते. पथनाट्य, योगा, मेडिटेशन, लीडरशिप, व्यसनमुक्ती अशा विविध विषयांवर चर्चासत्र व मार्गदर्शन करण्यात आले. पहाटे पाज वाजल्यापासून दैनंदिन उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी आपापले काम वाटून घेत स्वयंपाक, वर्गखोल्यांची साफसफाई केली. आसपासच्या परिसराला व जवळपास असलेल्या गाई, म्हशींच्या गोठ्यांनादेखील भेटी दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देबाजीत सरकार यांनी महत्त्वाच्या सर्वसमावेशक विकास, निःस्वार्थ सेवा आणि नेतृत्व विकास यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एनएसएसच्या आजी-माजी विद्यार्थ्यांसह प्राध्यापक रामसागर यादव ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवस शिबिर उत्कृष्टरीत्या पार पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com