काँक्रीट मिक्सरखाली चिरडून पाच वर्षीय मुलाचा मृत्यू

काँक्रीट मिक्सरखाली चिरडून पाच वर्षीय मुलाचा मृत्यू
Published on

काँक्रीट मिक्सरखाली चिरडून पाचवर्षीय मुलाचा मृत्यू

भाईंदर, ता. २६ (बातमीदार) : सिमेंट काँक्रीट वाहून नेणाऱ्या मिक्सरखाली आल्याने पाचवर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. २६) घडली. ही घटना भाईंदर पूर्व येथील नवघर रस्ता परिसरात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. जयनील विश्वकर्मा असे मृत मुलाचे नाव आहे. सचिन तेंडुलकर मैदान परिसरात सुरू असलेल्या कामासाठी या मार्गावरून सिमेंट काँक्रीट मिक्सरची ये-जा सुरू होती. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास जयनील हा रस्ता ओलांडत असताना या मिक्सरच्या चाकाखाली चिरडला गेला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी नवघर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून मिक्सर जप्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com