नोकरशाहांच्या कार्यालयातील दलालांचे काय?
नोकरशहांच्या कार्यालयातील दलालांचे काय?
‘सप’चे आमदार रईस शेख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : मंत्रालय दलालापासून मुक्त करण्याची मोहीम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केली आहे. त्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी, खासगी सचिवांची नियुक्ती करताना मुख्यमंत्री कार्यालयाकडून तपासणी सुरू आहे. मंत्री कार्यालयातील साफसफाईची मोहीम सुरू असताना दुसरीकडे प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बेकादा सक्रिय असलेल्या खासगी व्यक्तींवर केव्हा कारवाई होणार, असा सवाल समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शेख यांनी या प्रकाराकडे लक्ष वेधले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी पीएस आणि ओएसडी नेमण्यासाठी पाठवलेल्या नावांना कात्री लावली. मंत्र्यांकडून आलेल्या १२५ अधिकाऱ्यांच्या यादीतील १६ अधिकाऱ्यांच्या नावावर मुख्यमंत्र्यांनी फुली मारली आहे. दुसरीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयात असे अनेक खासगी व्यक्ती अनधिकृत कार्यरत असल्याचा आरोप आमदार रईस शेख यांनी केला आहे. पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्यातील प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याच्या कार्यालयात एका खासगी व्यक्तींची प्रशासकीय कामकाजात लुडबूड सुरू आहे. ही व्यक्ती शासकीय बैठकांना उपस्थित राहते, कामाचा आढावा घेते. दैनंदिन बाबींमध्ये विभागातील कर्मचाऱ्यांना सूचना देणे, सचिवांच्या वतीने अनुपालन आणि संबंधित बाबींशी संबंधित विकसक किंवा प्रकल्प समर्थकांशी संपर्क साधण्यासाठी आणि समन्वय साधण्याचे कामही ही व्यक्ती करीत असल्याचा प्रकार रईस शेख यांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिला आहे.
कन्सल्टन्सी फर्मच्या माध्यमातून ही व्यक्ती कर्मचारी म्हणून मागच्या दरवाजाने मंत्रालयात दरवेळी दाखल होते. विभागातील संवेदनशील स्वरूपाची माहिती दुसऱ्या व्यक्तीला पुरवत आहे. ज्या व्यक्तीला तो माहिती पुरवतो, ती व्यक्ती हॉटेलमध्ये नियमित बैठका घेते. तो थेट मंत्री पंकजा मुंडे आणि प्रधान सचिवांचे प्रतिनिधित्व करतो, असे सांगतो, असा दावाही आमदार शेख यांनी केला आहे.
----
मंत्रालय दलालमुक्त करा!
जर मंत्रालय दलालमुक्त करायचे असतील तर मंत्री कार्यालयासोबत अशा नोकरशहांच्या कार्यालयात बेकायदा कार्यरत असलेल्या या खासगी व्यक्तींना तातडीने मंत्रालयातून हाकलून द्यावे, अशी मागणी रईस शेख यांनी केली आहे. हे सर्व हाताबाहेर जाण्यापूर्वी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची विनंती शेख यांनी या पत्राद्वारे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

