नालेसफाई १५ मार्चनंतर सुरू

नालेसफाई १५ मार्चनंतर सुरू

Published on

नालेसफाई १५ मार्चनंतर सुरू
छोट्या नाल्यांसाठी पालिकेची निविदा प्रक्रिया पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः मुंबईतील मोठ्या आणि छोट्या नाल्यांची पावसापूर्वीची नालेसफाई करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी निविदा प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून, १५ मार्चनंतर नालेसफाईचे काम सुरू केले जाणार आहे. तसेच मार्चअखेरपर्यंत मोठ्या नाल्यांच्या सफाईचे काम सुरू करण्याचा प्रयत्न पालिकेचा राहणार आहे. या कामासाठी पालिकेकडून सुमारे ३९५ कोटी रुपये खर्च केला जाईल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
मुंबईतील पावसापूर्वी नालेसफाईसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, मात्र पहिल्या पावसातच नाले तुंबून पाणी साचते. नाले तुंबत असल्याने पालिकेचे दावे खोटे ठरतात. त्यामुळे नालेसफाईवरून दरवर्षी पालिकेला टीकेला सामोरे जावे लागते. त्यामुळे यंदा वेळेत पावसापूर्वीची नालेसफाई पूर्ण करण्याचे नियोजन पालिकेचे आहे. त्‍यासाठी निविदा प्रक्रिया फेब्रुवारीअखेरपर्यंत पूर्ण करून मार्चपासून नालेसफाईचे काम हाती घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्‍यानुसार छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी निविदा प्रक्रिया जवळपास पूर्ण झाल्याने १५ मार्चनंतर नालेसफाई करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. मोठ्या नाल्यांसाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
यंदा जानेवारीअखेरीस निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गाळ काढण्याचे उदिष्ट पूर्ण करणे शक्य होईल, असे प्रशासनाला वाटते आहे. त्यामुळे यंदा वेळेत नालेसफाईला प्रारंभ करण्याचे नियोजन पालिकेचे आहे.

गेल्‍या वर्षी २४९ कोटी रुपये खर्च
गेल्या वर्षी १६ मार्चपासून नालेसफाईचे काम हाती घेण्यात आले होते. पावसापूर्वी ७५ टक्के, पावसाळ्यात १५ टक्के, पावसाळ्यानंतर १० टक्के, अशा तीन टप्प्यांत नालेसफाई केली जाते. मागील वर्षी गाळ उपसण्यासाठी पालिकेने ३१ कंत्राटदारांची नेमणूक केली होती. त्या वेळी २४९ कोटी रुपये खर्च केले होते, मात्र तरीही पावसाळ्यात पाण्याचा निचरा न झाल्याने पहिल्याच पावसात पाणी साचले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com