पालिकेच्या ६१ शाळांवर राहणार नजर

पालिकेच्या ६१ शाळांवर राहणार नजर
Published on

कल्याण, ता. ४ (वार्ताहर) : राज्य सरकार आणि कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकरिता सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. पालिकेच्या ६१ शाळांमध्ये ५०२ सीसीटीव्ही. कॅमेरे लावण्यात आले आहेत.
सरकारी निर्णयानुसार खासगी, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने कल्याण-डोंबिवली महापालिकेने तत्काळ सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचे काम हाती घेतले होते. पालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. शाळांतील सीसीटीव्ही यंत्रणेची ठराविक अंतराने फुटेज तपासणी आणि काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास त्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी विशेषत्वाने मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीची असणार आहे. मुख्याध्यापकांनी आठवड्यातून किमान तीन वेळा फुटेज तपासणी करणे आवश्यक राहील. शाळेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास याबाबत स्थानिक पोलिस प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहणार आहे.

मुख्याध्यापकांच्या कक्षेत मॉनिटर
महापालिकेच्या एकूण ६१ शाळांमध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्या सुरक्षिततेसाठी एकूण ५०२ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सर्व शाळांमध्ये मुख्याध्यापकांच्या कक्षात सीसीटीव्ही मॉनिटर बसवण्यात आले आहे, असे विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंत्रा प्रशांत भागवत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com