एक्स्प्रेसच्या डब्ब्यांमध्ये अभ्यासाचे धडे
सुधाकर वाघ ः सकाळ वृत्तसेवा
टोकावडे, ता. ४ ः माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या न्याहाडीतील शाळा बंद होण्याच्या मार्गावर होती. पण शाळेचे शिक्षक अंकुश घरत यांनी दारोदार फिरत दानशूर व्यक्ती तसेच माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने एक्स्प्रेसच्या डब्ंब्याप्रमाणे रंगछटा देत शाळा साकारली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत येणाऱ्या पर्यटकांसाठी ही शाळा आकर्षणाचे केंद्र ठरत असून शाळेचे स्वरूप बदलल्याने विद्यार्थ्यांची पटसंख्या पण वाढली आहे.
माळशेज घाटाचे पायथ्याशी असलेल्या न्याहाडी जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेत सातवीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात. जुन्या झालेल्या शाळेची देखभाल, दुरुस्ती होत नसल्याने अवघी २४ पटसंख्या शिल्लक राहिली होती. शाळेची दयनीय अवस्थेमुळे लवकरच शाळा बंद पडण्याची शक्यता असल्याने शाळेचे शिक्षक अंकुश घरत यांनी माजी विद्यार्थ्यांच्या पालकांकडे धाव घेतली. माजी विद्यार्थ्यांना बोलावून शाळेचे रुपडे बदलण्याची संकल्पना त्यांनी मांडली. सर्व विद्यार्थ्यांनी देखील घरत यांनी मदतीचे आश्वासन देताना दुरुस्तीचे काम केले. अनेक सहकारी शाळेचे सौंदर्य पाहून स्वतःहून शाळेला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. विशेष म्हणजे, घरत यांनी गरजू विद्यार्थ्यांच्या पालकांना स्वःखर्चाने मदत केली आहे. त्यांच्या प्रयत्नातूनच विविध सहकारी संस्थांच्या मदतीने त्यांनी नळ पाणीपुरवठा योजना सुरू करत आदिवासींना २४ तास पिण्याचे पाणी उपलब्ध केले आहे.
-------------------------------------------------------
शैक्षणिक गुणवत्तेमुळे गावाचा विकास
जिल्हा परिषदेच्या न्याहाडी केंद्रात १९९६ पासून कार्यरत असलेले घरत शाळेचे रुपडे तर पालटून टाकले आहे. शिवाय आदिवासी मुलांना भौतिक सुविधांबरोबर चांगले व्यक्तिमत्व घडवण्यासाठी मदतही केली आहे. त्यांच्या याच प्रयत्नांतून असंख्य मुले शासकीय तसेच खासगी क्षेत्रात काम करत आहेत. तसेच शैक्षणिक गुणवत्तेमुळे गावाचाही विकास झाला आहे. त्यामुळे घरत गुरुजींनी आम्हाला घडवल्याची प्रामाणिक कबुली ग्रामस्थ देतात.
---------------------------------------
जिल्हा परिषदेच्या न्याहाडी शाळेचे रूप बदलल्याने मुले शाळेकडे आकर्षित होऊन पटसंख्या वाढली आहे. आजूबाजूच्या वाडी वस्तीवरील पालकांचाही मुलांना शाळेत प्रवेश घेण्याचा कल वाढला आहे.
- अंकुश घरत, शिक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

