

नायगाव उड्डाणपूल धोकादायक
दुचाकीस्वाराचा पुलावरून पडून मृत्यू; दोन जण जखमी
बोळींज, ता. ४ (बातमीदार) : नायगाव उड्डाणपुलावर भरधाव वेगाने येणारी दुचाकी थेट खाली कोसळली. रविवारी (ता. २) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे; तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तुषार जोगळे (३०) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या पुलावरून कोसळून अपघात होण्याची ही दुसरी घटना आहे. नायगाव पूर्व व पश्चिमेला जोडणारा नायगाव उड्डाणपूल आहे. या उड्डाणपुलावर दररोज मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ असते.
रविवारी सायंकाळी दुचाकीवरून तुषार व त्यांचे दोन सहकारी नायगाव उड्डाणपुलावरून उमेळाफाटा येथे भरधाव वेगाने जात होते. या वेळी दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि थेट दुचाकी पुलावरून खाली कोसळली. यात तुषार जोगळे (३०) याचा जागीच मृत्यू झाला, तर सुजल मालपेकर (१९) व सचिन सुतार (३५) हे गंभीर जखमी झाले आहेत. हे तिघेही नायगाव पूर्वेच्या चंद्रपाडा येथे राहात आहेत. याप्रकरणी माणिकपूर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या नायगाव उड्डाणपुलावरून खाली कोसळून अपघात होण्याची दुसरी घटना आहे. यापूर्वी नायगाव पश्चिमेच्या वडवली परिसरात राहणारा अतुल दुबळा (२०) याचा दुचाकीवरून जात असताना अपघात घडला व त्याची दुचाकी थेट कठड्याला धडकली. यात तो थेट पुलावरून खाली कोसळून त्याचा मृत्यू झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.