टाटा कर्करोग रुग्णालयाचा पदपथ मोकळा

टाटा कर्करोग रुग्णालयाचा पदपथ मोकळा

Published on

टाटा कर्करोग रुग्णालयाचा पदपथ मोकळा
पालिकेच्या एफ दक्षिण विभागाची कारवाई
धारावी, ता. ४ (बातमीदार) : मुंबईतील कर्करोगावरील रुग्णालय म्हणून देशभरात प्रसिद्ध असलेल्या परळ येथील टाटा कर्करोग रुग्णालयात देशभरातून उपचारासाठी रुग्ण व त्यांचे आप्तेष्ट येतात. रुग्ण नसणारे बेघर व अन्य कुटुंब येथील पदपथावर झोपड्या उभारून राहू लागले होते. त्यामुळे आज (ता. ४) टाटा रुग्णालय, पालिकेच्या एफ दक्षिण विभागाने संयुक्त कारवाई करीत पोलिसांच्या बंदोबस्तात पदपथावरून सर्वांना हटवून पदपथ मोकळा केला.
रुग्णांनी व त्यांच्या नातेवाइकांनी रुग्णालयाजवळील सेंट झेवियर मार्ग, वाडिया मार्ग या ठिकाणी असलेल्या पदपथावर राहण्यास सुरुवात केली. हळूहळू पदपथावर राहणाऱ्यांची संख्या वाढू लागली होती. रुग्ण नसणारे बेघर व अन्य कुटुंब पदपथावर झोपड्या उभारून राहू लागले होते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली, मात्र रुग्णालयाकडून रुग्णांची माहिती घेऊन त्यांची दुसरीकडे व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती अधिकारी देत होते. रुग्णांची सविस्तर माहिती घेऊन रुग्णांना धीर दिला जात होता. ज्या ठिकाणी रुग्णांची राहण्याची सोय प्रशासनाकडून केली जाईल, तिथून त्‍यांना रुग्णालयात आणण्याची सोय करण्यात येईल, असे भोईवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन कदम यांनी सांगितले.

रुग्‍णांची राहण्याची व्यवस्‍था
कर्करोगाने ग्रस्त असलेल्या व मुंबईत आसरा नसलेल्या रुग्ण व त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाइकांची वांद्रे, दादर, कुर्ला आदी भागात राहण्याची सोय केली असल्याची माहिती भोईवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन कदम यांनी दिली. अचानक झालेल्या कारवाईमुळे रुग्ण व त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाइकांची कारवाईवेळी तारांबळ उडाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com