चोरीस गेलेले ३०० मोबाईल केले परत

चोरीस गेलेले ३०० मोबाईल केले परत

Published on

चोरीला गेलेले ३०० मोबाईल केले परत
घाटकोपर पोलिसांची कारवाई
घाटकोपर, ता. ४ (बातमीदार) ः चोरीला गेलेल्या आणि हरवलेल्‍या ३०० मोबाईल फोनचा तपास लावण्यात घाटकोपर पोलिस पथकाला यश आले आहे. मुंबई गुजरात, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल आदी राज्यांतून हे मोबाईल शोधून काढण्यात आले.
एकूण ३७ लाख ७३ हजार किमतीच्या ३०० मोबाईलचा शोध घेण्यात या पथकाला यश आले. २०२३ ते आतापर्यंत गहाळ, चोरी झालेल्या विविध प्रकरणांतील या फोनचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस उपायुक्त विजयकांत सागर, घाटकोपर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश काळदाते, पोलिस निरीक्षक (गुन्हे) दीपाली कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईल चोरी व मोटार वाहन चोरी प्रतिबंधक पथकाचे उपनिरीक्षक पांडुरंग साळुंखे, दीपक भारती, नीलेश पवार, अमोल सूर्यवंशी, अजय अहिरे, बाळासाहेब गव्हाणे आणि अंमलदार यांनी ही कामगिरी केली आहे.

पोलिसांचे मानले आभार
घाटकोपर एलबीएस मार्गावरील पाटीदार हॉलमध्ये नुकतेच उपायुक्तांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात तक्रारदारांना त्यांचे फोन परत करण्यात आले आहेत. आपले हरवलेले तसेच चोरीला गेलेले मोबाईल फोन पुन्हा हाती आल्याने अनेकांनी सुटकेचा निःश्वास टाकत पोलिसांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com