समृद्धी महामार्गावर आमणे उड्डाणपूल आवश्यक

समृद्धी महामार्गावर आमणे उड्डाणपूल आवश्यक
Published on

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि बडोदा जेएनपीटी मार्ग सुरू होत आहे. त्यामुळे भविष्यात कल्याण पश्चिमेला बापगाव, आमणे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ शकते. आमने येथे गोदामांची संख्या वाढत असून, अवजड वाहनांची वर्दळ असते. यामुळे बापगाव मार्ग चौपदरी करण्यासोबतच आमणे येथे उड्डाणपुलाची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संबंधीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. त्याची पुढे अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी आता पाटील यांनी केली आहे.
कल्याण शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि भिवंडी-बापगाव येथील गोदामांची वाढती संख्या; तसेच शहरीकरण पाहता या मार्गावर वाहनांची संख्या वाढणार असल्याची माहिती रवी पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली होती. त्या अनुषंगाने बापगाव येथील रस्त्याचे चौपदरीकरण आणि आमणे येथे उड्डाणपुलाची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. कल्याण येथे ४५ मीटर रिंगरोडला हा उड्डाणपूल जोडावा, यामुळे कल्याण, डोंबिवली, भिवंडी, पनवेल, नवी मुंबई व इतर शहराची कोंडी कमी होईल. त्यामुळे शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या विषयीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयी योग्य ती पावले उचलावीत. कल्याण शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपुलाची उभारणीचा प्रस्ताव तयार करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे पाटील यांनी सांगितले.

भविष्यात कोंडीची भीती
कल्याण पश्चिमेला वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी रिंगरुटचे काम केले जात आहे. सद्यस्थितीत कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा, नवी मुंबईमार्गे गांधारी पूल ४५ मीटर रिंग रोडने कल्याण पश्चिमेतून पडघामार्गे नाशिक, नगर व पुढे प्रवास करत आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग सुरू झाला आहे. तसेच बडोदा जेएनपीटी मार्गही सुरू होत आहे. या अनुषंगाने वाहतूक कोंडी भविष्यात मोठ्या प्रमाणात होणार आहे. हा पूल आमणे येथे नागरिकांसाठी आवश्यक असल्याने एमएमआरडीए किंवा एमएसआरडीसीच्या माध्यमातून समृद्धी आणि बडोदा महामार्गाला जोडणारा उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com