कौस्तुभ गांगण याची आयआयटी मद्रासमध्ये निवड

कौस्तुभ गांगण याची आयआयटी मद्रासमध्ये निवड

Published on

कौस्तुभ गांगण याची आयआयटी मद्रासमध्ये निवड
माणगाव, ता. ४ (बातमीदार) ः द. ग. तटकरे महाविद्यालयातील विद्यार्थी कौस्तुभ गांगण याची आयआयटी मद्रासमध्ये डेटा सायन्स अभियांत्रिकीसाठी निवड झाली आहे. त्‍यामुळे माणगाव शहरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. माणगावमधील द. ग. तटकरे ज्युनियर कॉलेजमध्ये कौस्तुभ विज्ञान विभागात शिकत आहे. स्मार्ट वर्गखोल्या आणि कृतीआधारित शिक्षणाच्या मदतीने त्याने गणित आणि विज्ञानातील जटिल संकल्पना समजून घेतल्या. केवळ पाठांतर न करता त्यांचा गाभा समजून घेतला. कौस्तुभने सांगितले, की आयआयटी मद्रासच्या बीएस पदवी कार्यक्रमासाठी पात्र ठरण्याच्या माझ्या प्रवासात महत्त्वपूर्ण भूमिका महाविद्यालयाने बजावली आहे. माझे शिक्षक, मार्गदर्शक आणि संपूर्ण महाविद्यालयीन प्राधिकरण यांचे सातत्यपूर्ण पाठबळ, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com