सेवा रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू
सेवा रस्त्यांचे काँक्रीटीकरण सुरू
उड्डाणपुलाची उंची वाढवण्याची मागणी
कासा, ता. ४ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी नाका परिसरात सध्या दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण सुरू आहे. या भागात पावसाळ्यात पाणी साचून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे स्थानिकांनी अनेकदा महामार्ग प्राधिकरणाकडे सुधारणा करण्याची मागणी केली होती.
चारोटी उड्डाणपुलाची उंची तुलनेने कमी असल्याने मोठ्या वाहनांना अडथळा निर्माण होतो. विशेषतः डहाणू-नाशिक राज्य परिवहन महामार्गावरील बस आणि मोठे मालवाहू ट्रक या पुलाखाली अडकण्याच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी उड्डाणपुलाखालील जागेची उंची वाढवण्याची मागणी केली आहे.
मागील वर्षी पावसाळ्यात चारोटी उड्डाणपुलाखाली आणि सेवा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक वाहनांचे अपघात झाले होते. तसेच महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. सध्या सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामात योग्य उतार ठेवला नाही. त्यामुळे यंदाही पावसाळ्यात पाणी साचून तीच समस्या उद्भवू शकते, अशी चिंता वाहनचालक व्यक्त करत आहेत; मात्र महामार्ग प्राधिकरणाने ठेकेदाराला सेवा रस्त्यांचे काँक्रीटीकरण करताना योग्य उतार ठेवण्याच्या सूचना दिल्याचे महामार्ग प्राधिकरणाचे प्रबंधक सुहास चिटणीस यांनी सांगितले आहे.
चारोटी उड्डाणपुलाजवळील सेवा रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण सुरू आहे. पावसाळ्यात येथे पाणी साचू नये, यासाठी योग्य उतार देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच उड्डाणपुलाखालील उंची कमी राहू नये, यासाठीही पर्याय तपासले जात आहेत.
- सुहास चिटणीस, महामार्ग प्राधिकरण प्रबंधक.
चारोटी नाक्यावर उड्डाणपुलाखालील सेवा रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण सुरू आहे. मागील पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. महामार्ग प्राधिकरणाने योग्य नियोजन करून पाण्याचा निचरा होईल, याकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच चारोटी कमी असल्याने तेथे आवश्यक उपाययोजना कराव्यात.
- हेमंत धानमेर, सेवा निवृत्ती संघ, कासा अध्यक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

