महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याकडे शासनाकडून दुर्लक्ष : शशिकांत बिराजदार

महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याकडे शासनाकडून दुर्लक्ष : शशिकांत बिराजदार
Published on

महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याकडे शासनाकडून दुर्लक्ष : शशिकांत बिराजदार
खोपोली, ता. ४ (बातमीदार) ः बाराव्या शतकात सर्वत्र अशांतता, असहिष्णुतेचे वातावरण असताना समता, बंधुभाव, स्त्री-पुरुष समानता व कर्तव्य आणि कार्यावर आधारित समाज हे कृतीतून सांगणारे, लोकशाहीचे आद्य प्रवर्तक महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याची दखल कर्नाटकसह महाराष्ट्र सरकार व शासनानेही घेतली नाही. आपण थोर महापुरुषांना समाजात वाटून घेतल्याची खंत नवी मुंबई महापालिकेचे माजी उपमहापौर शशिकांत बिराजदार यांनी व्यक्त केली. या वेळी बोलताना शेतकरीच या देशाचा मळ कणा असून, दुर्दैवाने याकडेही सरकारे व शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा शोक त्यांनी व्यक्त केला.
खोपोलीतील ज्येष्ठ कवयित्री व लेखिका रेखा कोरे लिखित ''महात्मा बसवेश्वर'' - कृतीतून प्रगतीकडे, या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच खोपोलीतील ऋषीवन रिसॉर्टच्या सभागृहात दिमाखात पार पडले. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नवी मुंबई महापालिकेचे माजी उपमहापौर शशिकांत बिराजदार उपस्थित होते. त्यांच्यासह विशेष अतिथी म्हणून निवृत्त जिल्हाधिकारी व ज्येष्ठ सनदी अधिकारी सुभाष सोनवणे, कोकण विभागाचे उपायुक्त गणेश शेटे, कोकण मराठी साहित्य परिषद खोपोली शाखेचे सर्व पदाधिकारी, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व कोरे परिवाराचे सर्व सदस्यांसह मोठ्या प्रमाणावर साहित्यप्रेमी उपस्थित होते. या वेळी मान्यवरांनी रेखा कोरे यांना शुभेच्छा देताना, महात्मा बसवेश्वर यांच्या १२ व्या शतकातील समाजकार्याची माहिती उपस्थितांना दिली व बसवेश्वर हे खरे लोकशाही मूल्यांचे आद्य पुरस्कर्ते व समाजसुधारक होते, हे विविध घटनाक्रम प्रस्तुत करून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. भाऊसाहेब नन्नवरे यांनी केले. या वेळी नेव्ही कमांडर आशीष कोरे यांना खोपोली कोमसापकडून मानपत्र देऊन त्यांना विशेष गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com