कचरा संकलनासाठी भंगार गाड्यांचा वापर

कचरा संकलनासाठी भंगार गाड्यांचा वापर
Published on

कचरा संकलनासाठी भंगार गाड्यांचा वापर

बदलापूर, ता. ४ (बातमीदार) : कुळगांव-बदलापूर नगरपालिका क्षेत्रात पूर्व आणि पश्चिम भागात कचरा संकलनासाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्या या नियमबाह्य आहेत. नंबर प्लेट नसलेल्या व भंगारात निघतील अशा अवस्थेतील गाड्या शहरात कचरा संकलनासाठी वापरल्या जात आहेत. त्यामुळे ठेकेदाराच्या या गैरप्रकाराकडे पालिकेचे लक्ष आहे का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

बदलापुरात पूर्व आणि पश्चिमेला पालिकेकडून शहरातील कचरा संकलनासाठी दोन ठेकेदार नेमले आहेत. यातील मे. बनसोड हा ठेकेदार पूर्वेला, तर पश्चिमेला मे. पांचाळ कंपनीला ठेका दिला आहे; मात्र शहरात कचरा संकलनासाठी हे ठेकेदार नियमबाह्य गाड्या वापरत आहेत. या गाड्यांमुळे अपघातांना निमंत्रण दिले जात आहे. विशेष म्हणजे या गाड्यांना कोणत्याही प्रकारची नंबर प्लेट नाही. गाड्या कचरा संकलन करून बंदिस्त न करता कचरा नेतात. हवेने बरेचदा हा कचरा बाहेर पडतो. त्यामुळे स्वच्छता होण्याऐवजी शहरात ठिकठिकाणी हा कचरा पुन्हा साठत असतो, शिवाय गाड्यांची अवस्था पाहिली, तर या गाड्यांची क्षमता आणि अवस्था आरटीओकडून तपासली गेली आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे विनानंबर प्लेट असलेल्या गाड्यांचा वापर करणाऱ्या या ठेकेदारांवर कारवाई करावी. या गाड्या त्वरित बंद कराव्यात, शिवाय ठेकेदाराचा ठेका बंद करून नियमानुसार कचरा संकलन करणाऱ्या दुसऱ्या ठेकेदाराला हे काम पालिकेने द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

ठेकेदारांना नोटिसा बजावल्या
आरोग्य विभागाच्या अधिकारी श्रेया शिरवटकर यांना याबाबत विचारले असता त्यांनी यापूर्वी पालिकेने या ठेकेदारांना नोटिसा बजावल्या आहेत. आता पुन्हा वाहतूक विभाग व पालिका यासंदर्भात नव्याने नोटीस बजावणार आहे. तसेच पुढील दोन महिन्यांत या दोन्ही ठेकेदारांची मुदत संपणार आहे. नव्याने ठेकेदारी देताना अशा प्रकारची गैरसोय व चुकीचे काम होऊ नये, याची काळजी नक्कीच घेऊ, असे शिरवटकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com