खासगी रुग्णालयांची झाडाझडती

खासगी रुग्णालयांची झाडाझडती
Published on

भिवंडी, ता. ४ (बातमीदार): राज्याच्या आरोग्यसेवा विभागाच्या संचालकांनी राज्यातील सर्व नोंदणीकृत खासगी रुग्णालयांत महाराष्ट्र शुश्रूषा नोंदणी अधिनियम १९४९ मधील तरतुदींच्या पालनाबाबत शहानिशा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार भिवंडी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील एका खासगी रुग्णालयावर कारवाई केली आहे. त्यामुळे खासगी वैद्यकीय सेवा देणारी आस्थापने सतर्क झाली आहेत.
भिवंडीतील दक्ष नागरिक नागेश निमकर यांना मेहेर हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना आलेल्या वाईट अनुभवावरून शहरातील खासगी रुग्णालयाविरोधात राज्यपालांकडे लेखी तक्रार केली होती. त्याची दखल घेत राज्यातील आरोग्य विभागाच्या संचालकांनी भिवंडी शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये महाराष्ट्र शुश्रूषा नोंदणी अधिनियम १९४९ मधील तरतुदींची तपासणी करण्याचे निर्देश पालिकेला दिले होते. या तक्रारीनंतर पालिकेने मेहेर हॉस्पिटलच्या व्यवस्थापनास हॉस्पिटलची नोंदणी रद्द केली होती. तसेच हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना अन्य रुग्णालयांत पुढील उपचारासाठी पाठवण्याचे निर्देश देताना पुढील आदेशांपर्यंत कामकाज बंद करण्याची नोटीस बजावली होती, पण रुग्णालय व्यवस्थापनाने कायदेशीर बाबींची पूर्तता करून रुग्णालय सुरू ठेवले, पण घटनेमुळे शहरातील खासगी रुग्णालयांच्या व्यवस्थापनांमध्ये खळबळ माजली आहे.
--------------------------------------------------
शहरात १४१ खासगी रुग्णालये
भिवंडी शहरात महापालिकेची १९ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. १० स्व. बाळासाहेब ठाकरे दवाखाना, तर आठ आरोग्यवर्धिनी केंद्रे आहेत, तर इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयदेखील आहे. असे असताना भिवंडीत महापालिकेच्या नोंदीनुसार १४१ खासगी रुग्णालये आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांची वाढलेली संख्या चिंताजनक असून, बहुतांश ठिकाणी महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन (सुधारित) नियम २०२१ शासनाच्या नवीन नियमांची अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------
शासन नियमांच्या अंमलबजावणीची पडताळणी
नर्सिंग होम रजिस्ट्रेशन (सुधारित) नियम २०२१ नुसार शासनाच्या नवीन नियमांची अंमलबजावणी करण्याचे काम शहरात सुरू केले आहे. भिवंडीतील खासगी रुग्णालयात या नियमांची अंमलबजावणी होते की नाही, याची तपासणी केली जात असल्याचे भिवंडी महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संदीप गाडेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com