बैल चोरीचा प्रयत्न फसला
शहापूर, ता.४ (बातमीदार): दुचाकीवरून आलेल्या दोघांना चोरलेला बैल रस्त्यातच सोडून पळावे लागेल. रविवारी पहाटे गुरे चोरण्याचा हा प्रयत्न कसारा विभागातील फुगाळे ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे फसला.
कसारा गावच्या आसपासच्या खेड्यातील जनावरे दिवसरात्र मोकाट फिरत असतात. हीच संधी साधून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फूगाळे गाव हद्दीत मोकाट बैल चोरण्याचा प्रयत्न केला. ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतरी त्यांनी दोघांची विचारपूस केली. पण त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत ग्रामस्थांशी झटापटी करून दुचाकीसह धूम ठोकली. विशेष म्हणजे, गेल्या तीन महिन्यात फुगाळे गावासह वाशाळा, कसाराखुर्द, कसारा बुद्रुक, मोखावणे, शिरोळ, अजनुप गावांत ५० हून अधिक जनावरे चोरीला गेली आहेत. याप्रकरणी कसारा पोलिस ठाण्यात गुन्हे देखील दाखल आहेत. मात्र तरी देखील जनावरे चोरीचे सत्र कायम असल्याने चोरट्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

