घरकुल योजनेचे ४५२ लाभार्थी

घरकुल योजनेचे ४५२ लाभार्थी
Published on

शहापूर (वार्ताहर) : जनजाती गौरव दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार आदिवासी न्याय महाअभियान सुरू करण्यात आले आहे. देशातील ७५ विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांचा विकास साधणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. याअंतर्गत मंगळवारी शहापूर तालुक्यात चार हजार ७९ कातकरी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ४५२ लाभार्थी घरकुल योजनेसाठी पात्र ठरले आहेत. शहापूर तालुक्यात कातकरी कुटुंबांना पक्के घर मिळवून देण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. या अभियानात आधी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी व मुरबाड याच तीन तालुक्यांचा समावेश करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात दोन हजार ४०५ लाभार्थी घरकुलाचे लाभार्थी ठरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com