जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
Published on

भिवंडी, ता. ४ (वार्ताहर)ः शहरातील शांतीनगर परिसरात दारू व जुगाराच्या व्यसनामुळे पतीकडून मानसिक तसेच शारीरिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शांतीनगर येथील अब्दुल रेहमान अन्सारीचा २०२३ मध्ये उजेमा फिरदोस्तसोबत निकाह झाला होता. दारू आणि जुगाराच्या आहारी गेलेला अब्दुल अन्सारी पत्नीला मारहाण करून तिचा मानसिक, शारीरिक छळ करीत होता. या जाचाला कंटाळून उजेमाने सोमवारी मध्यरात्रीच्या पिराणी पाडा येथील रहेमत कॉम्प्लेक्स येथील घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com