खारघर, तळोजामध्ये बस थांब्यावर निवारा शेड

खारघर, तळोजामध्ये बस थांब्यावर निवारा शेड

Published on

खारघर, तळोजामध्ये बस थांब्यावर निवारा शेड
पनवेल महापालिकेचा पुढाकार; प्रवाशांना दिलासा
खारघर, ता. ४ (बातमीदार) : पनवेल पालिकेकडून खारघर तसेच तळोजा परिसरातील बस थांब्यावर निवारा शेड उभारण्यात येणार असल्यामुळे प्रवासी समाधान व्यक्त करीत आहे.
नवी मुंबई महानपालिकेकडून खारघर परिसरात एनएमएमटीची बससेवा सुरू केल्यावर बस थांब्यावर प्रवाशांच्या सोयीसाठी निवारा शेड उभारण्यात आले होते. दरम्यान, खारघर वसाहत पनवेल महापालिकेकडे हस्तांतरण करण्यात आल्यामुळे एनएमएमटी प्रशासनाने निवारा शेडकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, गेल्या पाच वर्षांत खारघर परिसरातील बस थांब्यावरील निवारा शेडची दुरवस्था झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच खारघर सेक्टर ३० ते ४० आणि तळोजा वसाहतमधील बस थांब्यावर निवारा शेड नसल्याने प्रवाशांसह आबालवृद्ध ग्रामस्थांचे हाल होत आहेत. त्यामुळे येथील ठिकाणी प्रवासी निवारा शेडची उभारण्याची मागणी व्हावी, अशी मागणी प्रवाशांसह रहिवाशांकडून केली जात होती. विशेष म्हणजे तळोजा फेज दोनमधील बस थांब्यावर निवारा शेडअभावी प्रवाशांना ऊन-पावसात भिजत बसच्या प्रतीक्षेत उभे रहावे लागत आहे. त्‍यामुळे प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन पनवेल महापालिका प्रशासनाकडून खारघर आणि तळोजा वसाहतमधील बस थांब्यावर नवीन आणि सुसज्ज असे निवारा शेड उभारण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. प्रत्येक बस थांब्यांवर निवारा शेड उपलब्ध होणार असल्यामुळे प्रवासी समाधान व्यक्त करीत आहे.
....................
तळोजा फेज दोन वसाहतमधील बस थांबा हे विनानिवारा शेडचे असल्यामुळे प्रवाशांना ऊन- पावसात बसच्या प्रतीक्षेत उभे रहावे लागत आहे. सध्या दिवसेंदिवस ऊन्‍हाळा वाढत आहे. पालिकेने एप्रिल पूर्वी निवारा शेड उभारून सहकार्य करावे.
- प्रवीण दळवी, पदाधिकारी मनसे तथा रहिवासी फेज तळोजा फेज दोन
.......................
खारघर तळोजा परिसरातील बस थांब्यावर पालिकेकडून निवारा शेड उभारण्यात येणार असून, निविदा प्रक्रिया सुरू आहे. सदर परिसरातील जागा सिडकोची असल्यामुळे शेडच्या परवानगीसाठी सिडकोकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
- सदाशिव कवटे, परवाना विभाग, पनवेल महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com