नॅशनल सेफ्टी काऊन्सिल मध्ये ‘राष्ट्रीय सुरक्षा दिवस’ साजरा

नॅशनल सेफ्टी काऊन्सिल मध्ये ‘राष्ट्रीय सुरक्षा दिवस’ साजरा
Published on

नॅशनल सेफ्टी काऊन्सिलमध्ये ‘राष्ट्रीय सुरक्षा दिवस’ साजरा
तुर्भे, ता. ४ (बातमीदार) ः नवी मुंबईतील बेलापूरमध्ये मंगळवारी (ता. ४) राष्ट्रीय सुरक्षा परिषद अर्थात नॅशनल सेफ्टी काउन्सिल यांच्या वतीने ५४वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. देशभरात ४ मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा केला जात आहे. सध्या हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाच्या स्वरूपात साजरा केला जात आहे. देशातील नागरिकांमध्ये सुरक्षेप्रति जागरूकता निर्माण करणे आणि देशातील दुर्घटना थांबवणे हा या दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे.
नॅशनल सेफ्टी काउन्सिल ही भारतातील विविध क्षेत्रांमध्ये सुरक्षा जागरूकता आणि अशासकीय पद्धतीने ना नफा ना तोटा या तत्त्वावर काम करते. या संस्थेची ४ मार्च १९६६ रोजी भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने स्थापन केली होती. नॅशनल सेफ्टी काउन्सिलच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा, अग्नी सुरक्षा, विद्युत सुरक्षा या मोहिमेतून सर्वसामान्यांमध्ये जागरूकता आणि सार्वजनिक ठिकाणी अपघात कमी करण्यासंदर्भात मार्गदर्शन व उत्तम आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने काम करीत आहे. तसेच इतर अनेक दुर्घटना टाळण्यासाठी काय करावे, यासंबंधित सर्वसामान्य नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. नॅशनल सेफ्टी काउन्सिल दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करताना एक थीम आयोजित करते. यावर्षी ‘राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त विकसित भारतासाठी सुरक्षितता आणि आरोग्य आवश्यक’ या शीर्षकाखाली निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, नॅशनल सेफ्टी काउन्सिल ही संस्था आज ६०व्या वर्षात पदार्पण करीत आहे. संस्थेचे महासंचालक डॉ. ललित आर. गभने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा लेखापरीक्षण अहवालांचे डिजिटायझेशन; सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरण या विषयावरील चर्चासत्र पार पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com