सातारा जायला निघाला पण...

सातारा जायला निघाला पण...

Published on

मुलीला शुभेच्छा देऊन
घेतला जगाचा निरोप
वडिलांचा ठाणे बसस्थानकावर मृत्यू
ठाणे शहर, ता. ४ (बातमीदार) ः दहावीची परीक्षा सुरू असलेल्या मुलीला चांगले पेपर सोडव, अभ्यासाचे दडपण घेऊ नकोस, अशा धीरवजा शुभेच्छा देऊन साताऱ्याला जाण्यासाठी निघालेल्या वडिलांचा सोमवारी रात्री ठाण्याच्या वंदना एसटी बसस्थानकावर मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह बसस्थानकाच्या आरक्षण खिडकीजवळ आढळला. उत्तरीय तपासणीनंतर त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे निष्पन्न झाले.

ठाण्यातील यशोधननगर येथील रहिवासी तेजस सावंत यांचे नातेवाईक संग्राम शिंदे हे साताऱ्यातील कोरेगावात राहतात. शिंदे यांचा मुलगा व मुलगी ठाण्यात सावंत यांच्याकडे शिक्षण घेतात. मुलगी दहावीला, तर मुलगा चौथ्या वर्गात आहे. मुलीची दहावीची परीक्षा सुरू असल्याने ते मुलीला भेटण्यासाठी ठाण्याला आले होते. मुलीला भेटून परत साताऱ्याला जाण्यासाठी ते सोमवारी रात्री वंदना बसस्थानकात आले होते. मध्यरात्री साडेबारा वाजताची बस ते पकडणार होते. मुलांचा निरोप घेऊन बसची वाट पाहत असताना अचानक त्यांचा मृत्यू झाला. येथील तिकीट आरक्षण खिडकीजवळ त्यांचा मृतदेह आढळला. मध्यरात्री दीडच्या सुमारास पुकार सेवा प्रतिष्ठानचे हेमंत जोशी यांना ही माहिती मिळताच त्यांनी नौपाडा पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदनात त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे स्पष्ट झाले. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर शिंदे यांचा मृतदेह गावी रवाना करण्यात आला.
-----
गर्दुल्ले समजून दुर्लक्ष
वंदना बसस्थानकात सुरक्षाव्यवस्था नसल्याने संग्राम शिंदे पडून असल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. तसेच बसस्थानकात गर्दुल्ले पडलेले असतात. शिंदे यांच्याबाबतही असेच समजून त्यांच्याकडे लोकांचे दुर्लक्ष झाले. पुढील तपास नौपाडा पोलिस ठाण्याकडून केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com