ग्लोबल कोकण महोत्सव उद्यापासून रंगणार
ग्लोबल कोकण महोत्सव उद्यापासून रंगणार
उद्योजकांसाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन; चार दिवस कार्यक्रम
घाटकोपर ता. ४ (बातमीदार)
कोकण भूमी प्रतिष्ठानच्या वतीने ग्लोबल कोकण महोत्सव २०२५ या कार्यक्रमाचे ६ ते ९ मार्च रोजी आयोजन केले आहे. हा कार्यक्रम नेस्को ग्राउंड, गोरेगाव (मुंबई) येथे भरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षपदी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, तर अध्यक्षपदी उद्योगमंत्री उदय सामंत असणार आहेत. महोत्सवाचे प्रमुख मार्गदर्शक माहिती तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार, वनमंत्री गणेश नाईक आणि महाराष्ट्राचे खाणमंत्री शंभूराज देसाई उपस्थित राहणार आहेत.
यंदा ग्लोबल कोकणच्या दशकपूर्तीनंतरचं हे अकरावे वर्ष आणि यानिमित्ताने कोकणवासीयांसाठी माहितीपूर्ण सत्र, उद्योजकांसाठी मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
--------------------------
स्टार्टअप्ससाठी नवे प्लॅटफॉर्म
राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना, गुंतवणुकीच्या संधी, कोकणात स्टार्टअप्ससाठी नवे प्लॅटफॉर्म, कृषी आणि पर्यटन उद्योगातील नव्या कल्पना, शासकीय सवलती आणि सहकार्य याविषयी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
----------------------------
कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष्य संजय यादवराव यांनी सांगितले की, यावर्षी ग्लोबल कोकण महोत्सवातील सर्वांत महत्त्वाचा विषय म्हणजे ‘कोकण बिझनेस कॉन्क्लेव्ह’. या चार दिवसांमध्ये एक भव्य मार्गदर्शन सेमिनार सुरू करण्यात येणार आहे. या कक्षात शेती, पर्यटन, मासेमारी, प्रक्रिया उद्योग, स्टार्टअप्स आणि शासकीय योजनांवरील तज्ज्ञ मंडळी प्रत्यक्ष येऊन कोकणवासीयांना वैयक्तिक मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय छोटे-छोटे वर्कशॉप्स आयोजित करण्यात येणार आहेत, जे कोकणातील तरुणांना आणि उद्योजकांना नव्या संधी शोधण्यास मदत करता येणार आहे.
------------------------
अभियानाचा संकल्प
महोत्सवाच्या केवळ चार दिवसांपुरते नव्हे, तर पुढील २५ वर्षे हे मिशन सुरू राहणार आहे. समृद्ध महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि कोकण विकासाचे विविध क्लब यासंदर्भात प्रत्यक्ष काम करत आहेत. गावागावात हजारो प्रकल्प उभे राहून लाखो तरुणांना कोकणातच रोजगार उपलब्ध होणे हा या अभियानाचा संकल्प आहे.
---------------------------
शब्दांमधून कोकणाचा आवाज
दररोज संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत कोकणच्या रंगारंग लोकसंस्कृतीचा सोहळा येथे रंगणार असल्याचे सांगण्यात आले. कोकणातील सर्वोत्तम दशावतार नाट्यप्रयोग, परदेशात झळकणारे पहिले नमन सादरीकरण, आदिवासी परंपरेचा अभिमान– तारपा नृत्य, पालखी नृत्य, जाखडी नृत्य, गौरी नाच, कोकणी कवी संमेलन – शब्दांमधून कोकणाचा आवाज! ‘लाभले आम्हास भाग्य’– कौशल इनामदार यांचा कार्यक्रम होणार आहे, तर शनिवारी (ता. ८) मराठी हिप-हॉपचे सादरीकरण होणार आहे. कोकणचा अस्सल चवदार स्वाद घेण्यासाठी विशेष फूड फेस्टिव्हल आयोजित केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

