शेअर्समध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने कोटींची फसवणूक

शेअर्समध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने कोटींची फसवणूक
Published on

शेअर्समध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने कोटींची फसवणूक
फायदा होत असल्याचे दाखवून लूट

नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : शेअर्स गुंतवणुकीमध्ये जास्त फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका सायबर टोळीने नेरूळमध्ये राहणाऱ्या ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला एक कोटी १० लाख रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. शेअरखान कंपनीच्या नावाने बनावट ॲपद्वारे जास्तीचा फायदा होत असल्याचे दाखवून त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. नवी मुंबईच्या सायबर पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात सायबर टोळीविरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
या प्रकरणात फसवणूक झालेले सलीम पालेकर (वय ६८) हे नेरूळमध्ये राहत असून १० जानेवारीला सायबर टोळीने त्यांचा मोबाईल नंबर शेअरखान ऑफिशिअल नेटवर्किंग कम्युनिटी या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड केला होता. या ग्रुपमध्ये असलेले अनेक सदस्य शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करीत असल्याचे तसेच त्यांना चांगला नफा झाल्याचे चॅटिंगद्वारे भासवत होते. शेअर मार्केटमध्ये शेअरखान कंपनीचे मोठे नाव असल्याने पालेकर यांनी व्हॉट्सॲप ग्रुपवरील सदस्यांच्या चॅटिंगवर विश्वास ठेवून त्यांनी या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचा मेसेज त्यांनी ग्रुपवर टाकल्यानंतर सायबर टोळीने त्यांना एक लिंक पाठवून शेअरखान ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर पालेकर यांनी वृत्तपत्रातील माहिती आणि ग्रुपमधील माहिती सारखीच वाटल्याने त्यांना विश्वास वाटला. त्यानंतर पालेकर यांना सायबर टोळीकडून वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे पाठवण्यास सांगितले. त्यानुसार पालेकर यांनी १७ ते २० फेब्रुवारी २०२५ या कालावधीत त्यांच्या बचत खात्यातून तब्बल एक कोटी १० लाखांची रक्कम पाठवली. त्यानंतर त्यांना पालेकर यांना दोन कोटी ८० लाख रुपये फायदा झाल्याचे दाखवण्यात आले. त्याचवेळी ५० लाख ८२ रुपयांचे आयपीओ शेअर्स भरण्यास सांगितले; मात्र पालेकर यांच्याकडे इतकी रक्कम नसल्याने त्यांनी ही रक्कम भरली नाही. त्यामुळे सायबर टोळीकडून पालेकर यांना आयपीओ शेअर्सची ५० लाखांची रक्कम भरल्यानंतरच त्यांना नफ्याची रक्कम काढता येईल, असे सांगण्यात आले.
शेअरखानच्या कार्यालयात संपर्क साधल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघड झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रथम एनसीआरपी पोर्टलवर व नंतर सायबर पोलिसात तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com