

आनंद आश्रमातील संवादातून दिलासा
शेकडो तक्रारींचे निवारण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : समस्या, सेवा आणि समाधान या त्रिसूत्रीवर आधारित आनंद आश्रमात शिंदे गटाचा मंगळवारपासून ‘जनसंवाद’ उपक्रम सुरू झाला आहे. उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी शेकडो अर्ज प्राप्त झाले असून, त्याचे निवारण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. यापुढेही दर मंगळवारी आनंद आश्रमात जन संवाद उपक्रम नियमित सुरू राहणार याची माहिती माजी महापौर अशोक वैती यांनी दिली.
वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेतल्यानंतर शिवसेना शिंदे गटासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या जनता दरबाराला जनसंवादने उत्तर देण्यासाठी दर मंगळवारी (ता. ४) आनंद आश्रम येथे नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा उपक्रम शिवसेना शिंदे गटाने घेतला आहे. त्या अनुषंगाने समस्या, सेवा आणि समाधान या त्रिसूत्रीवर आधारित शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेता मनोज शिंदे यांनी मंगळवारी ठाण्यातील टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात जन संवाद उपक्रम आयोजित केला होता. जन संवादात शिक्षण, आरोग्य, पाणी, निवारा, क्रीडा, कला, विज्ञान व सामाजिक सद्यःस्थितीतील वाद-कलह आदीसह ठाणे नगरविकास आराखड्याबाबतच्या समस्यांचे निवारण करण्यावर प्रामुख्याने भर दिला. आनंद आश्रमात आयोजित जन संवाद उपक्रमात उपस्थित शेकडो नागरिकांनी आपल्या तक्रारी व समस्यांचे निवेदन या वेळी सादर केले. या वेळी शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख मिनाक्षी शिंदे यांच्यासह ठाणे महापालिका हद्दीतील शिवसेनेचे सर्व शहरप्रमुख व उपशहरप्रमुख देखील उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.