अपघातानंतर ट्रक व ट्रेलरला भीषण आग

अपघातानंतर ट्रक व ट्रेलरला भीषण आग

Published on

अपघातानंतर ट्रक व ट्रेलरला आग
मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
मनोर, ता. ४ (बातमीदार) ः मुंबई अहमदाबाद महामार्गावर वैतरणा नदीच्या परिसरात ट्रक आणि ट्रेलरचा मंगळवारी पहाटे एक वाजता अपघात झाल्यानंतर दोन्ही वाहनांना भीषण आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
मुंबईहून गुजरातच्या दिशेने सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रेलरचालकाचे वैतरणा नदी पुलाच्या परिसरात नियंत्रण सुटल्याने तो दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकला. या धडकेनंतर दोन्ही वाहनांना आग लागल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवत अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने महामार्गावरून हटविली. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com