खड्ड्यांवरून काँग्रेसचे उल्हासनगरमध्ये आंदोलन

खड्ड्यांवरून काँग्रेसचे 
उल्हासनगरमध्ये आंदोलन
Published on

खड्ड्यांवरून काँग्रेसचे
उल्हासनगरमध्ये आंदोलन
कार्यकर्त्यांकडून वाहनचालकांना बाम, मास्कचे वाटप
उल्हासनगर, ता. ४ (वार्ताहर) : उल्हासनगरमध्ये भुयारी गटार योजनेसाठी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले. त्यासोबतच शहरातील धुळीचे साम्राज्य आणि जीवघेण्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत निषेध करण्यासाठी काँग्रेसने मंगळवारी (ता. ४) नेताजी चौकात आंदोलन केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई या आंदोलनात सहभागी झाले.
उल्हासनगर महानगरपालिकेने भुयारी गटार प्रकल्पासाठी शहरभर मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची खोदाई केली. परिणामी वाहनचालक, प्रवासी तसेच स्थानिकांना या खड्ड्यांमधून मार्ग काढताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या विरोधात उल्हासनगरात काँग्रेसने शहराध्यक्ष रोहीत साळवे यांच्या नेतृत्वात मंगळवारी आंदोलन केले. आंदोलनावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी वाहनचालकांना बाम आणि मास्क वाटप करत महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले.आंदोलनाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी भेट दिली. ही परिस्थिती केवळ उल्हासनगरपुरती मर्यादित नसून मुंबईसह अनेक शहरांमध्येही खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत असल्याचे दलवाई यावेळी म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिंदे गटाच्या आमदारांना फोडण्याच्या तयारीत आहेत, असा खळबळजनक दावा दलवाई यांनी यावेळी केला. सध्याच्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे. शिंदे गट सर्वाधिक अस्वस्थ आहे. फडणवीस हे शिंदे गटाच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळेच हे सरकार नीट चालत नाही, असा थेट आरोप दलवाई यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com