वजन नियंत्रणात आणण्यासाठी तेलाचा वापर कमी करा!
वजन नियंत्रणात आणण्यासाठी तेलाचा वापर कमी करा!
तज्ज्ञांचा सल्ला; दिवसाला फक्त तीन चमचे घ्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : भारतीयांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यासाठी विविध घटक कारणीभूत आहेत. असंतुलित आहार, फास्ट फूड आणि आहारातील जास्तीच्या तेलाचे प्रमाण यामुळे स्थूलपणा वाढतो. जास्त प्रमाणात तेलाचा वापर केल्यामुळे हृदयविकाराचा आणि कोलेस्ट्रॉलचा धोकाही वाढतो. दिवसाला फक्त तीन चमचेच तेल घ्या, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरीरातील अतिरिक्त तेल हे लठ्ठपणा व त्यामुळे उद्भवणारे इतर आजार जसे कर्करोग, फॅटी लिव्हर, कॉलेस्ट्रॉल, मधुमेह यावर ‘मन की बात’ या कार्यक्रमात भाष्य केले होते. तसेच आहारातील १० टक्के तेलाचे सेवन कमी करण्याचे आवाहन केले. हीच बाब लठ्ठपणा तज्ज्ञांनीही अधोरेखित करीत त्याचे फायदे आणि महत्त्व सांगितले. खाद्यतेलाच्या वापरात १० टक्के कपात करण्याचा सल्ला दिला आहे.
बॅरिएट्रिक आणि लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर म्हणाल्या, की जेवण करताना छोट्या चमच्याचा वापर करा. उकडलेले, वाफवलेले पदार्थ जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करा. तेल वारंवार गरम केल्यामुळे त्याची गुणवत्ता खराब होते. तेल पुन्हा गरम केल्यामुळे त्यात फ्री रॅडिकल्स तयार होतात. ज्यामुळे पदार्थाची चवही बिघडू शकते. त्यामुळे तेलाचा पुनर्वापर टाळा. आतापर्यंत लठ्ठपणाने ग्रस्त असंख्य रुग्णांवर उपचार केले असून त्यांच्या दैनंदिन आहाराच्या सवयी या त्यांच्या दीर्घकालीन आरोग्यावर परिणाम करतात, असे डॉ. अपर्णा गोविल भास्कर म्हणाल्या.
असे होतात बदल
आहारात तेलाचा वापर कमी केल्यास वजन कमी होण्यास मदत होते, शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका कमी होतो आणि पचनाच्या समस्या दूर करता येतात. आहारात तेलाचा वापर हा आपण पूर्णपणे टाळू शकत नाही; पण ते वापरण्याचे प्रमाण नक्कीच कमी करू शकतो, असे डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

