शकुंतला विद्यालयात समुपदेशन कार्यक्रम

शकुंतला विद्यालयात समुपदेशन कार्यक्रम

Published on

शकुंतला विद्यालयात समुपदेशन कार्यक्रम
टिटवाळा, ता. ९ (वार्ताहर) जागतिक महिलादिनानिमित्त शिक्षण विकास मंडळ संचालित शकुंतला विद्यालयाच्या मराठी प्राथमिक विभागात महिलांच्या सक्षमीकरण व सबलीकरणासाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वंदना चव्हाण होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून विनायक मार्शल आर्ट्‌स अँड फिटनेस झोनचे संस्थापक विनायक कोळी यांनी महिला सुरक्षिततेसंदर्भात बचाव तंत्राचे प्रात्यक्षिक सादर केले. ॲडव्होकेट प्रांजल जाधव यांनी महिलांच्या मासिक पाळीविषयी माहिती दिली. याशिवाय महाराष्ट्र पोलिस सेवेत कार्यरत असलेल्या कावेरी चलवादी व निशा बुरसे यांनी राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या विविध योजनांबाबत तसेच महिला सुरक्षिततेसाठी कार्यरत पोलिस यंत्रणेची माहिती दिली. ज्येष्ठ नागरिक कुलकर्णी यांनी सकारात्मक विचारांचे महत्त्व, अध्यात्म व विज्ञानाच्या माध्यमातून जीवनातील जाणीव जागृती यावर मार्गदर्शन केले. या वेळी ‘माझा पहिलीत प्रवेश’ या उपक्रमाअंतर्गत पहिलीच्या वर्गासाठी प्रवेश फॉर्म वितरित केले. कार्यक्रमाला पालक प्रतिनिधी व महिला पालकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक प्रतिनिधी व महिला पालकांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com