आत्महत्येला प्रेरित करणाऱ्या आरोपीला अखेर अटक

आत्महत्येला प्रेरित करणाऱ्या आरोपीला अखेर अटक
Published on

आत्महत्येला प्रेरित करणाऱ्या आरोपीला अखेर अटक
पीडितेच्या आईची न्यायालयात धाव


मालाड, ता. ९ (बातमीदार) : आत्महत्येसाठी प्रेरित करणाऱ्या आरोपीला अखेर मालवणी पोलिसांनी अटक केली. १० फेब्रुवारी रोजी मालवणीतील खारोडी अलीतलाव येथील २२ वर्षीय तरुणीने प्रियकर आरोपी जितेश गाडे याने फसवणूक करून दुसऱ्या मुलीशी लग्न केल्याचा जाब विचारला होता. त्यावेळी पीडितेला आरोपी गाडे याने अमानुषपणे मारहाण केली होती. या घटनेनंतरच पीडितेने १० फेब्रुवारी रोजी घरामध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर पीडितेने दिनांक १० फेब्रुवारीला घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी दिंडोशी सेशन कोर्टात २५ फेब्रुवारी रोजी अर्ज केला होता; मात्र न्यायालयाने तो फेटाळला होता. त्यानंतर ४ मार्च रोजी आरोपी जितेश गाडे याला मालवणी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी अटक केली. पोलिसांनी न्यायालयात अटक केल्यानंतर जितेश गाडे याला १० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पीडितेचे वकील सुभाष पगारे यांनी दिली आहे.
या घटनेमध्ये पीडितेच्या बाजूने वकील सुभाष पगारे, वकील गणेश चव्हाण व वकील नेहा पाटील यांनी न्यायालयात बाजू मांडली. तसेच राज्य मानवाधिकार आयोगाने पीडितेच्या आईच्या तक्रारीरून मानवाधिकार आयोगात केस नोंदवल्याची माहितीही पीडितेच्या आईने सांगितली.
-------------------------
कोट : आरोपीला अटक करून पुढील तपास करण्यात येत आहे. घटनेबाबत ज्या ज्या गोष्टी असतील त्यांचा तपास केला जाणार आहे.
- श्रीकांत इंगवले, पोलिस निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com