शहापूर तालुक्याला उन्हाचे चटके

शहापूर तालुक्याला उन्हाचे चटके
Published on

शहापूर, ता. ९ (बातमीदार): राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याचे भाकीत मुंबई वेधशाळेने वर्तवले आहे. शहापूर तालुक्यात मार्चमध्ये उन्हाच्या झळा जाणवू लागल्या असून, उष्णता वाढल्याने बदलत्या वातावरणाशी जुळवून घेताना ज्येष्ठांसह लहान मुले, महिलांना अडचणी येत आहेत.
शहापूर तालुक्यात सध्या पहाटे थोडी थंडी पडत आहे, तर दिवसा सकाळी आठ ते सहा वाजेपर्यंत कडक ऊन आहे. या वातावरणाशी जुळवून घेताना लहान मुलांपासून मोठ्यांनाही त्रास होत आहे. दुपारच्या वाढत्या उन्हामुळे सार्वजनिक ठिकाणे ओस पडली आहेत. सायंकाळी सहानंतरच अनेक जण घराबाहेर पडतात. तापमानवाढीने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे विनाकारण उन्हामध्ये घराबाहेर जाऊ नका, असे आवाहन शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिलाक शिंदे यांनी दिला आहे. तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम ठेवण्यासाठी कोकम, लिंबू, पाणी, नारळ पाणी, ताक यांचे सेवन करण्याचा सल्ला खर्डी येथील डॉ. किशोर जाधव यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com