खुटारवाडी ग्रामस्थांची वाट खडतर
टोकावडे, ता. ९ (बातमीदार)ः मुरबाड तालुक्यातील खोपिवली ग्रामपंचायत हद्दीतील खुटारवाडी रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. या गावातील रस्त्यासाठीचा निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून मंजूर झाला असून रस्त्याचे काम सुरू झाले नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
खुटारवाडी गावात जाणारा डांबरी रस्ता देहरी गावातून जातो. दवाखान्यात, बाजारपेठेत जाण्यासाठी हा एकच मार्ग असल्याने त्याचा वापर होता; पण रस्त्यावर नावालाही डांबर उरले नसल्याचे चित्र आहे. खडीमुळे रस्त्यावरून दुचाकीवरून प्रवास करणे कठीण झाले आहे. त्यामुळे वाडीतील ९० कुटुंबांवर अतिशय खडतर असा प्रवास करण्याची वेळ आली आहे. या रस्त्याबाबत स्थानिकांनी अनेकदा राजकारण्यांकडे व्यथा मांडली आहे; परंतु कोणी लक्ष देत नसल्याचे देहरी-खुटारवाडी रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.
------------------------------------
देहरी-खुटारवाडी रस्त्यावर १५ ते १६ वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून दुचाकीवर दवाखान्यात अथवा बाजारपेठेत जाताना अपघात होण्याची शक्यता आहे.
- प्रियंका वाघ, माजी सरपंच, खोपिवली-खुटारवाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

