उपसरपंचपदी अंकुश सातपुतेंची निवड

उपसरपंचपदी अंकुश सातपुतेंची निवड
Published on

किन्हवली (बातमीदार)ः शहापूर तालुक्यातील अस्नोली ग्रामपंचायतीत होतकरू तरुणांना नेतृत्वाची संधी मिळावी, या उद्देशाने उपसरपंच अर्जुन दिनकर यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी उपसरपंचपदी अंकुश सातपुते यांची बिनविरोध निवड झाली आहे. सरपंच विष्णू देसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत उपसरपंचपदासाठी अंकुश सातपुते यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे निवडणूक अधिकारी अमोल ओंकारेश्वर यांनी सातपुते यांची उपसरपंचपदी निवड झाल्याची घोषणा केली. या वेळी माजी आमदार पांडुरंग बरोरा, माजी जि.प. सदस्य राजेंद्र विशे, उद्योजक अविनाश साबळे, नामदेव गिरा, खरेदी-विक्री संघाचे माजी सभापती दत्तात्रय दिनकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com