

कासा, ता. ९ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील रानशेत येथील महालक्ष्मी गडावर लागलेल्या वणव्यामुळे १० ते १५ दुकाने जळून खाक झाली आहेत. या घटनेमध्ये पूजेचे साहित्य, प्रसाद विकणाऱ्या दुकानदारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी वन विभागाच्या उदासीनतेवर रोष व्यक्त केला आहे.
डहाणू तालुक्याच्या पूर्व भागात लहान-मोठे अनेक डोंगर व टेकड्या आहेत. उन्हाळ्यात कोरडा पालापाचोळा साचल्याने शिकार व अन्य हेतूने डोंगरांमध्ये आग लावण्याच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी साये, उर्से डोंगरांना लागलेल्या वणव्यामुळे जंगल जळाले होते. दोनच दिवसांपूर्वी वाघाडी येथील ससाली डोंगरालाही आग लावण्यात आली होती, तर कचरा पेटवल्यामुळे कासा येथेदेखील आग लागली होती.
महालक्ष्मी गडाच्या परिसरात शुक्रवारी (ता. ७) रात्री अचानक आग भडकली. ही आग दुपारपासून लागली असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. या आगीत महालक्ष्मी डोंगरावरील महालक्ष्मी मंदिरात जाण्याच्या वाटेवर असणारी १० ते १५ दुकाने जळून खाक झाली. आग विझवण्यासाठी महालक्ष्मी वन परिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले, पण आग मोठ्या प्रमाणात लागल्याने परिसरातील डोंगर जळून खाक झाला. या आगीत मोठ्या प्रमाणात वनसंपत्तीचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
दुपारच्या वेळी आग लागल्याचे कळल्यावर महालक्ष्मी वन परिक्षेत्रातील कर्मचारी ब्लोअरच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होते. कडक ऊन व घनदाट जंगलामुळे आग भडकली. वन विभागाकडून वणव्यांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- सुजय कोळी, वन विभाग अधिकारी, कासा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.