कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे‘पिंक रॅली’

कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे‘पिंक रॅली’
Published on

कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे ‘पिंक रॅली’
कल्याण, ता. ९ (बातमीदार) : जागतिक महिलादिनानिमित्त शनिवारी (ता. ८) उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते, तर सकाळी आठ वाजता रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी पिंक रॅली काढण्यात आली. ही पिंक रॅली रोनक सिटी ते पाटीदार भवन शहाडमार्गे आधारवाडी चौक-खडकपाडा सर्कल-प्रेम ऑटो मार्गे काढण्यात आली. या रॅलीत सुमारे दीडशे महिलांनी दुचाकी, चारचाकी व अबोली रिक्षा चालवून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये वाहनाचे सुशोभीकरण, आकर्षक पेहराव, रस्ता सुरक्षासंदर्भात घोषवाक्ये, भाषण व प्रश्नमंजुषा आदींचा समावेश होता. प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्या महिलांना हेल्मेटचे वाटप केले. तसेच पिंक रॅली, वाहनांचे सुशोभीकरण, आकर्षक पेहराव, आकर्षक घोषवाक्य या स्पर्धांतील विजेत्या महिलांना द्वारकादास श्याम कुमार यांच्यातर्फे मानाची पैठणी देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल, टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मनोहर बोंद्रे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी रमेश कलुरकर आदी उपस्थित होते.
त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व मोटर वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी, रिक्षा चालक-मालक संघटनांचे प्रतिनिधी आणि कर्मचारी व इतर नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com