रुग्णवाहिकेअभावी जखमी महिलेची तडफड

रुग्णवाहिकेअभावी जखमी महिलेची तडफड
Published on

रुग्णवाहिकेअभावी जखमी महिलेची तडफड
अपघातग्रस्त महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने नातेवाईक संतप्त

उल्हासनगर, ता. ९ ( वार्ताहर ) :- उल्हासनगरातील १०८ रुग्णवाहिका व्यवस्थापनाचा गलथानपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. जानेवारीत १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका वेळेत न आल्याने राहुल इंदाटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांना निलंबित केले होते. ही घटना ताजी असतानाच शनिवारी (ता. ८) उल्हासनगर रेल्वे स्थानकावर पुन्हा एक धक्कादायक प्रकार घडला. रेल्वे अपघातात गंभीर जखमी झालेल्या कमल साबळे यांना १०८ रुग्णवाहिकेच्या विलंबामुळे तब्बल एक तास उल्हासनगर रेल्वे स्थानकात तडफडत राहावे लागले.

शनिवारी (ता. ८) दुपारी कमल साबळे या महिलेचा रेल्वे स्थानकावर अपघात झाला. यात त्यांच्या दोन्ही पायांना जबर दुखापत झाली. स्थानिकांनी तत्काळ १०८ क्रमांकावर कॉल करून रुग्णवाहिका बोलावली; मात्र या महत्त्वाच्या क्षणी रुग्णवाहिका तब्बल एक तास उशिराने पोहोचली. एवढ्या विलंबानंतर त्यांना उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मुंबईतील सायन रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.

महिलेच्या गंभीर प्रकृतीमुळे पुन्हा एकदा १०८ रुग्णवाहिका बोलावण्यात आली, पण दुसऱ्यांदादेखील ही सरकारी सेवा वेळेवर उपलब्ध होऊ शकली नाही. अखेर महिलेच्या नातेवाइकांनी खासगी रुग्णवाहिका शोधली, परंतु त्या सेवेसाठी साडेतीन हजार रुपये मागविण्यात आले. शेवटी उपस्थित पत्रकारांनी प्रशासनाकडे विचारणा केल्यानंतर मध्यवर्ती रुग्णालयाने जखमीला आपलीच रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. या सगळ्या प्रकारानंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता १०८ रुग्णवाहिकेच्या यंत्रणेवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

तांत्रिक बिघाड
उल्हासनगरात १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नसल्याच्या अनेक घटना घडत आहेत. तांत्रिक बिघाड, अकार्यक्षम प्रशासन आणि उदासीन यंत्रणेमुळे वेळेवर रुग्णांना मदत मिळत नाही. याचा त्रास थेट गंभीर जखमी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना सहन करावा लागत आहे.

प्रशासनाचा गलथानपणा
रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न होणं म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. या घटनेने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज आहे अन्यथा आणखी किती निष्पाप जीव संकटात सापडतील, हा प्रश्न अनुत्तरितच राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com